अभिनेत्री महिमा चौधरी हिला स्तनाचा कर्करोग झाला आहे. महिमा चौधरी हिला स्तनाचा कर्करोग झाल्याचा खुलासा बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत केला आहे. व्हिडिओमध्ये महिमा म्हणते की, अनुपम खेर यांनी तिला एका प्रोजेक्टसंबंधी  काम करण्यासाठी यूएसमधून बोलावले होते, त्यानंतर तिने अनुपम यांना स्तनाच्या कर्करोगाविषयी सांगितले.