Anupam Kher

Cockroach Finds in Air India Food: एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाबाबत (Air India Food) सध्या अनेक तक्रारी समोर येताना दिसत आहेत. एका महिलेने सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या तक्रारीत म्हटले की, फ्लाइटमध्ये दिले गेलेल्या जेवणात एक मेलेले झूरळ आढळले (Cockroach Finds in Air India Food)आहे. एअर इंडियाच्या या निष्काळजीपणावर बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर(Anupam Kher) यांनीही प्रश्न उपस्थित केला आहे. खेर यांनी एका पोस्टद्वारे या प्रकरणाबाबत एअर इंडियाला टॅग केले, ज्यामध्ये त्यांनी या घटनेचे गांभीर्य अधोरेखित केले आहे.

महिलेची सोशल मीडियावर तक्रार

सुएशा सावंत नावाच्या महिलेने आपला अनुभव सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला त्यांनी म्हटले की, त्यांच्या २ वर्षाच्या लहान मुलाच्या ऑम्लेटमध्ये मेलेले झूरळ आढळले आहे. ऑम्लेटचा अर्धा भाग खाल्ल्यानंतर मुलाला अन्नातून विषबाधा झाली.

अनुपम खेर यांची पोस्ट

अनुपम खेर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की,'प्रिय @airindia! प्रत्येकाला माहित आहे की मला भारतासंबंधीत सर्व गोष्टी आवडतात. #AirIndia देखील त्यात येते. मात्र, @suyeshasavant माझ्या अभिनय अकादमीच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्या कधीच विनाकारण तक्रार करत नाही. त्यांनी खरच या गोष्टीचा सामना केला असेल, असे मला वाटते. मला आशा आहे तुम्ही त्यांचा परतीचा प्रवास आरामदायी आणि खास कराल. जो तो सर्वोत्तम एअरलाइन्सपैकी एक असेल. ज्यावर आम्ही विश्वास ठेवू शकतो!”

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

एका नेटकऱ्याने अनुपम खेर यांच्या पोस्टनंतर त्यांचे कौतुक केले. ही घटना पाहून त्याने वडिलांचे एअर इंडियाचे फ्लाइट रद्द केल्याचेही सांगितले. तक्रारदार महिलेच्या पतीने देखील या प्रकरणावर लिहिले की, "हे भयानक आहे @airindia, माझ्या पत्नीने फ्लाइट स्टाफकडे मदत मागितली, परंतु ते पूर्णपणे असहाय्य दिसत होते. आमच्यासाठी, विशेषतः आमच्या 2 वर्षांच्या बाळासाठी हा एक गैरसोयीचा प्रवास आहे."

एअर इंडियाची प्रतिक्रिया

एअर इंडियाने या घटनेबद्दल सुएशा सावंत यांची माफी मागितली आणि तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले. ही घटना केवळ गंभीर निष्काळजीपणाच दर्शवत नाही तर एअरलाइनने ग्राहकांचा विश्वास पुन्हा मिळवण्याची गरज देखील अधोरेखित करते.