Kangana Ranaut | (Photo Credits-Twitter Video)

Emergency Release Date Postponed: अभिनेत्री कंगना रणौत सध्या 'इमर्जन्सी' (Emergency) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. विविध प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचे ती प्रमोशन करत आहे. चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत असलेला श्रेयस तळपदे(Shreyas Talpade) आणि कंगना गेल्या आठवड्यात 'इमर्जन्सी'च्या प्रमोशनसाठी 'बिग बॉस मराठी'च्या घरी गेले होते. एकीकडे कंगनाचे जोरदार प्रमोशन सुरू असतानाच, या चित्रपटाबद्दल वाद वाढत चालले आहेत. सध्या सुरू असलेल्या वादांमुळे कंगनाचा ()हा आगामी चित्रपट 'इमर्जन्सी' नियोजित 6 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार नाही. चित्रपटाची रीलिजची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.(हेही वाचा:kangana Ranaut Slapping Case: कंगना रणौतला थप्पड मारल्या प्रकरणी खलिस्तानी दहशतवादी पन्नूकडून कॉन्स्टेबलला बक्षीस जाहीर )

या चित्रपटात कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. याशिवाय कंगनाने स्वतः 'इमर्जन्सी' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कंगनाचा हा आगामी चित्रपट 6 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज होता. परंतु प्रचंड वादाच्या पार्श्वभूमीवर, आता तो त्या तारखेला रिलीज होणार नाही. (हेही वाचा:kangana Ranaut Slapping Case: कंगना रणौतला थप्पड मारल्या प्रकरणी खलिस्तानी दहशतवादी पन्नूकडून कॉन्स्टेबलला बक्षीस जाहीर )

'इमर्जन्सी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना खूप आवडला होता आणि तेव्हापासूनच या चित्रपटाची चर्चा रंगली होती. मात्र, जसजशी रिलीजची तारीख जवळ येऊ लागली. तसतशी शीख समुदायाने चित्रपटावर आक्षेप घेतला. हा चित्रपट शीखविरोधी असल्याचा आरोप शीख समुदायाने केला आहे. लोकांनी कंगना रनौत आणि निर्मात्यांना चित्रपट प्रदर्शित न करण्याची धमकी दिली आहे.

चित्रपटा विरोधात उच्च न्यायालयात याचिका

चित्रपटा ला विरोध करत मोहालीचे रहिवासी गुरिंदर सिंग आणि जगमोहन सिंग यांनी हा चित्रपट आधी शिखांच्या प्रतिनिधींना दाखवावा, असा युक्तिवाद करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर चित्रपटाच्या विरोधात सातत्याने आवाज उठवला जात आहे. अकाली दल आणि एसजीपीसीनेही चित्रपटा ला विरोध केला होता.

चित्रपटाची स्टार कास्ट

कंगनाशिवाय अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, विशाक नायर, महिमा चौधरी आणि दिवंगत अभिनेते सतीश कौशिक हेही इमर्जन्सीमध्ये दिसणार आहेत. मात्र, सध्या प्रेक्षकांना चित्रपटाच्या नव्या प्रदर्शनाच्या तारखेची वाट पाहावी लागणार आहे.