Emergency Release Date: कंगनाने (Kangana Ranaut) तिच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे याची घोषणा केली. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख तिने सांगितली आहे. 17 जानेवारी 2025 ला भारत चित्रपट रिलीज होणार आहे.यासह, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो देखील अपडेट केला आहे. हा फोटो इमर्जन्सीच्या (Emergency Movie) सेटवर काढलेला फोटो आहे. ज्यात कंगना हात जोडून नमस्कार करताना दिसली. बाकीचे क्रू देखील शुभेच्छा देताना दिसत आहेत.
कंगनाच्या होम प्रॉडक्शन बॅनर मणिकर्णिका फिल्म्सच्या बॅनरखाली ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वत: कंगनाने घेतली आहे. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी होणे किती महत्त्वाचे आहे, हे कोणापासून लपून राहिलेले नाही. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सतत पुढे ढकलल्याने कंगनाला बराच काळ अडचणीत टाकले होते. अखेर चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
'या' दिवशी दाखल होणार थिएटरमध्ये
17th January 2025 – The epic saga of the nation’s most powerful woman and the moment that altered India’s destiny. #Emergency – Unveils Only in cinemas on 17.01.2025! @KanganaTeam @AnupamPKher #SatishKaushik @shreyastalpade1 #MahimaChaudhry @milindrunning #VishakNair… pic.twitter.com/dC0gnYSNlW
— Kangana Ranaut (@KanganaTeam) November 18, 2024
इमर्जन्सी हा चित्रपट यापूर्वी 14 जून 2024 रोजी रिलीज होणार होता. पण कंगनाच्या राजकीय प्रचारामुळे तिला तो पुढे ढकलावा लागला होता. त्यानंतर 6 सप्टेंबर ही त्याची रिलीज डेट निश्चित करण्यात आली होती, परंतु यावेळी या चित्रपटावर अनेक आक्षेप घेतल्याने प्रदर्शनात अडथळे आले. हा चित्रपट इंदिरा गांधी आणि देशातील आणीबाणीच्या कथेवर आधारित असल्याने त्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सीबीएफसीने यापूर्वी चित्रपटाला प्रमाणपत्र दिले होते. परंतु शीख समुदायाकडून चित्रपटावर आक्षेप घेण्यात आला. शीख समुदायाच्या लोकांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात धाव घेतली. तेव्हा केंद्र सरकारने अद्याप निर्मात्यांना प्रमाणपत्र दिले गेले नाही असे सांगितले.