काल रात्री आणि आज पहाटे मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने, शहरातील काही भागात पाणी साचले होते. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि जड वाहतुकीमुळे रहिवाशांची गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले. एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केलेल्या छायाचित्रांमध्ये मुंबईतील सायन परिसरात पाणी साचल्याचे दिसले.