Maharashtra Rain Alert: भारतीय हवामान विभागाने आज कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस वर्तवला आहे. कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज(Maharashtra Rain Alert) वर्तवला आहे. तर मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाच्या सरी (Maharashtra Rain) कोसळणार आहेत. विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (हेही वाचा:Typhoon Yagi Video: चीनमध्ये निसर्ग कोपला! यागी विशानकारी वादळामुळे अनेक इमारतींचे नुकसान; 4 नागरिकांचा मृत्यू )
वायव्य आणि लगतच्या मध्य बंगालच्या उपसागरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्रांमध्ये रूपांतरित झाले आहे . त्यामुळे पुढील काही दिवस कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज पुणे, सातारा, नाशिक व कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार पावसाची शक्यता असल्याने त्या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. (हेही वाचा: Maharashtra Rain Update: बीडमध्ये पावसाचा धुमाकूळ; नद्यांवरील पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला)
विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात आज हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.