दररोज कामानिमित्त मुंबई- ठाणे या भागात ये-जा करणाऱ्या नागरिकांना टोलचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. ठाण्यातील (Thane) वाहनांना टोलपासून मुक्ती मिळावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आनंदनगर येथील टोल नाक्यावर धरणे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले आहे. याआधीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 9 नोव्हेंबर रोजी आनंदनगर टोलनाका ते कोपरीपुलापर्यंत मोठा जमाव तयार केला होता. मात्र, आयोध्याच्या निकालामुळे पोलिसांनी आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती. ज्यामुळे आंदोलन पुढे ढकलण्यात आले होते.
महाराष्ट्र महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठाणे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या कामानिमित्त ये-जा करताना टोल भरावा लागत आहे. यामुळे संपूर्ण ठाणेकर संतप्त झाले आहे. ठाणेकरांचा प्रश्न सोडण्यासाठी मनसेनेचे जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांनी पाऊल उचलले आहे. तसेच ठाणेकरांच्या टोलमुक्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मानवी साखळीचे आयोजन करुन धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यातही मनसेने करमुक्तीसाठी आवाज उठवला होता. परंतु, आयोध्याचा निकालामुळे मसनेला त्यांचे आंदोलन मागे घ्यावे लागले होते. हे देखील वाचा- पंकजा मुंडे यांच्या नव्या फेसबूक पोस्टमुळे भाजपचे वरिष्ठ नेते, कार्यकर्ते होणार खूश
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोमवारी (2 डिसेंबर 2019) काँग्रेसच्या पाठोपाठ पाणीकपातीच्या विरोधात पिंपरीत माठ आंदोलन केले होते. महापालिकेच्या आवारात आंदोलन केले होते. महापौर उषा ढोरे यांची गाडी येताच आंदोलकर्त्यांनी माठ फोडण्यास सुरुवात केली होती. माहापालिका भवनासमोर शहाराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्ताखाली माठ आंदोलन केले होते.