Typhoon Yagi Video: चीनमध्ये सध्या विनाशकारी वादळ (Cyclone)सुरू आहे. हे वादळ सर्वात जास्त शक्तीशाली असल्याचं म्हटलं जातंय. यागी असं या वादळाला म्हटले जात आहे. काही दिवसापूर्वी चीनमधील हवामान विभागाने चीनमध्ये टायफून यागी (Yagi Typhoon)नावाचं वादळ येणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यामुळे आता हे शक्तीशाली वादळ चीनमध्ये धुमाकुळ घालत आहे.
हे वादळ सर्वात जास्त विनाशकारी असून चीनमध्ये आत्तापर्यंत 4 जनांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या हॉलिडे आयलँडवर धडकले आहे. हॉलिडे हे पर्यटनस्थळ आहे. दरम्यान वादळ आल्यामुळे तेथे इमारतींचे नुकसान झाले आहे. तसेच अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. घराचे, कार्यालयांचे पत्रे उडाले आहेत. येणार असल्याची शक्यता वर्तवल्यानंतर चीन सरकारने तेथील लोकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. (हेही वाचा: Cyclone Asna Update: चक्रीवादळ 24 तासांत भारतीय किनारपट्टीपासून पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता - आयएमडी)
चीन हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, टायफून यानी नावाचं वादळ प्रतितास 300 किमीच्या गतीने चीनला धडकले आहे. हे सर्वात शक्तीशाली वादळ आहे. वादळामुळे अनेक शहराचे नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेत येथील सरकारने 4.20 लाख लोकांना सुरक्षित छावण्यात हलवण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Hainan island मध्ये ट्रेन, बोट आणि प्लाइट बंद करण्यात आलेत. यासह पुढील काही दिवस शाळा बंद राहणार आहेत.
Terrifying winds hits due to Typhoon Yagi in Halong Bay of Quảng Ninh province, Vietnam 🇻🇳 (07.09.2024)
TELEGRAM JOIN 👉 https://t.co/9cTkji4D9S pic.twitter.com/MruMSUuGx1
— Disaster News (@Top_Disaster) September 7, 2024
Typhoon Yagi has made landfall in Vietnam. This is in Hai Phong. The winds must be something else to shift those containers 👀👀 pic.twitter.com/UBPbSH7olf
— Volcaholic 🌋 (@volcaholic1) September 7, 2024
चीनच्या विविध भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. ज्या ठिकाणी या वादळाचा प्रभाव कमी होईल तिथील लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चीनच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे वादळ हेनान बेटाजवळील गुआंगडोंगलाही प्रभावित करेल. या वादळाला श्रेणी ५ मध्ये ठेवण्यात आले आहे.