हवामान अंदाज: सोमवारपासून महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या चटक्यांपासून दिलासा मिळाला आहे. बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पूरक वातावरण निर्माण झाले. आज पासून पुढील चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह, मुसळधार आणि मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे. आज पहाटे मुंबई शहरात वीजांच्या कडकडाटीसह पावसाने हजेरी लावली आहे. जाणून घ्या राज्यातील आजचे (Weather Update) हवामान स्थिती (हेही वाचा- महाराष्ट्रामध्ये आज हवामान अंदाज काय? घ्या जाणून)
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज महाराष्ट्र राज्यातील कोकण, विदर्भ, मराठवाडा भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. राज्याच्या उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार. बंगालच्या उपसागरातील हवेचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पूर्व किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडणार आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून येत आहे
'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
राज्याच्या हवामानाची स्थिती पाहता हवामान विभागाने काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. किनारपट्टीचा भाग म्हणजे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर उर्वरित भागांना आज यलो अलर्ट दिला आहे.
23 सप्टेंबर, IMD कडून महाराष्ट्रात पुढील 4,5 दिवस खाली दिलेल्या प्रमाणे मुसळधार पावसाचा इशारा. 24 आणि 25 रोजी अधिक पावसाचे इशारे आहेत कृपया पहा.
Heavy rainfall alerts by IMD for next 4,5 days in Maharashtra. On 24 and 25 there are higher rainfall alerts to be watched pl. pic.twitter.com/Fc74WXyRvL
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 23, 2024
आज पहाटे देखील मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटीसह पाऊस झाला. सिंधुदुर्ग, अहमदनगर, रायगड, पुणे, सोलापूर, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळाचा अंदाज आहे.