अश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजे 'कोजागिरी पौर्णिमा' किंवा 'शरद पौर्णिमा' म्हणून साजरी केली जाते. कोजागिरी पौर्णिमे दिवशी चंद्राचे प्रतिबिंब केशरयुक्त दूधात पाहुन त्याचा आस्वाद घेतला जातो. म्हणून यास 'कौमुदी पौर्णिमा' असेही म्हणतात.