अश्विन महिन्याच्या शुक्लपक्षाच्या पौर्णिमेला शरद पौर्णिमा (Sharad Purnima 2023) म्हणतात. या दिवसाला कोजागरी पौर्णिमा (Kojagiri Purnima 2023), रास पौर्णिमा आणि कौमुदी व्रत असेही म्हटले जाते. यंदा शनिवार, 28 ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमा साजरी होणार आहे. हिंदू धर्मात या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, या पौर्णिमेच्या रात्री चंद्र अमृताचा वर्षाव करतो. म्हणूनच या रात्री घोटलेले दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवले जाते व मध्यरात्री 12 वाजता ते प्राशन केले जाते.
या दिवशी इंद्र, चंद्र, श्री हरी आणि महालक्ष्मी यांची पूजा करण्याचीही परंपरा आहे. पौराणिक मान्यतेनुसार, शरद पौर्णिमेच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मी समुद्रमंथनाच्या वेळी प्रकट झाली, म्हणून शरद पौर्णिमा ही देवी लक्ष्मीची जयंती म्हणून देखील साजरी केली जाते. शरद या पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. यावेळी घर स्वच्छ, सुंदर, प्रसन्न ठेवले जाते. या रात्री लक्ष्मी येऊन आपले घर ऐश्वर्याने भरून टाकते, असे मानतात.
तर अशा या मंगलमय दिनी तुम्ही खास मराठी Messages, Greetings, Quotes, HD Images, Wishes, Wallpapers शेअर करून तुमचे मित्र-मैत्रिणी, प्रियजन, नातेवाईकांना शरद पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ शकता.
दरम्यान, या वर्षी आश्विन महिन्याची पौर्णिमा 28 ऑक्टोबर रोजी पहाटे 04:17 वाजता सुरू होत आहे. 29 ऑक्टोबर रोजी पहाटे 01:53 वाजता ही तिथी संपेल. निशिता काळात कोजागरी पूजा करण्याची परंपरा आहे. अशा स्थितीत 28 ऑक्टोबर रोजी रात्री 11:39 ते 12:31 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल. या दिवशी संध्याकाळी 05:19 वाजता चंद्रोदय होईल. (हेही वाचा: Kojagiri Purnima 2023 Date: येत्या 28 ऑक्टोबरला साजरी केली जाणार कोजागिरी पौर्णिमा; जाणून घ्या शुभ मुहूर्तासह धार्मिक महत्व)
नवरात्र सुरू होण्यापूर्वी पितृपक्ष येतो आणि यात पितर पृथ्वीवर येतात. यावेळी पृथ्वीवर आलेल्या पितरांचे निवासस्थान चंद्रलोकात असते अशातच कोजागिरी पौर्णिमेच्या शीतलतेमुळे त्यांचा प्रवास सुखाचा होतो असाही समज आहे.