Kojagiri Wishes 2024 | File Image

हिंदू धर्मीय अश्विन पौर्णिमेच्या दिवशी कोजागरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) साजरी करतात. यंदा ही कोजागरी पौर्णिमा 16 ऑक्टोबर दिवशी साजरी केली जाणार आहे. अश्विन पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी माता चंद्र मंडळामधून पृथ्वीवर येते आणि संचार करते अशी मान्यता करते. तसेच कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहेत याची विचारणा करते. त्यामुळे कोजागरी पौर्णिमेची रात्र जागवतात. मग अशा या मंगलमय दिवशी तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना कोजागरीच्या शुभेच्छा देण्यासाठी लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेली ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, Wishes, Quotes, Facebook Messages, WhatsApp Status, Stickers शेअर करत हा दिवस साजरा करा.

कोजागरी पौर्णिमा च्या व्रतामध्ये रात्री लक्ष्मीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा केली जाते. चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात. चंद्राची पूजा करून त्याला दूध व खिरीचा नैवेद्य दाखवला जातो.

कोजागरी पौर्णिमेच्या शुभेच्छा

Kojagiri Wishes 2024 | File Image
Kojagiri Wishes 2024 | File Image
Kojagiri Wishes 2024 | File Image
Kojagiri Wishes 2024 | File Image

शरद पौर्णिमेचा दिवस हा लक्ष्मी मातेचा जन्मदिवस असतो असं मानलं जातं. या दिवशी लक्ष्मी माता समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण 16 कलांमध्ये असतो. तसेच त्याच्या किरणांमध्ये विशेष अमृतमयी गुण असतात. त्यामुळे अनेकजण कोजागिरीच्या रात्री मंद चंद्रप्रकाशामध्ये बसून रात्र जागवतात. दूध देखील याच चंद्रप्रकाशामध्ये उकळून प्यायलं जातं.