शरद ऋतूमधील अश्विन महिन्याची पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) म्हणून साजरी केली जाते. ही पौर्णिमा शरद पौर्णिमा किंवा कौमुदिनी पौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते. यंदा ही कोजागरी पौर्णिमा आज 16 ऑक्टोबर दिवशी साजरी केली जाणार आहे. मग या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळी, प्रियजणांना WhatsApp, Facebook, Instagram, X च्या माध्यमातून खास मेसेजेस, Quotes, Wishes, Greetings द्वारा नक्की शेअर करू शकाल. कोजागिरी पौर्णिमेची रात्र जागवण्याची प्रथा आहे. या रात्री लक्ष्मी माता पृथ्वीवर संचार करते अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. चंद्राच्या शीतल प्रकाशात दूध आटवून मसाले दुध पिण्याचा आनंद अनेकजण जण लुटतात. मग तुमच्या प्रियजणांना आज किमान सोशल मीडीयात शुभेच्छापत्र शेअर करत या दिवसाचा आनंद नक्कीच द्विगुणित करू शकाल. Kojagiri Purnima 2024: कोजागिरी पौर्णिमा; महत्त्व आणि पूजा विधी .
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर येते. जो मनुष्य जागा असेल त्याला सुख, शांती समृद्धी अशी धारणा आहे. समुद्रमंथनातून आजच्या म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेदिवशीच लक्ष्मी माता प्रकटली असे मानले जाते त्यामुळे हा दिवस तिचा जन्म दिवस आहे असेही अनेक जण मानतात. मग यादिवशी दूधाचा किंवा खिरीचा नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवण्याची रीत आहे.
कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा
कोजागिरीची रात्र ही गाणी गात, खेळ खेळत जागवली जाते. यामध्ये चंद्राच्या प्रकाशातच दूध आटवून त्याची खीर किंवा मसाले दूध केले जाते. नंतर प्रसाद म्हणून ते पिण्याची पद्धत आहे. या कोजागरीच्या रात्रीचं चांदणं हे खास असतं. यामध्ये विशेष अमृतमयी गुण असतात अशी धारणा असल्याने या रात्री सारे एकत्र जमतात.