
अश्विन पौर्णिमेचा दिवस हा कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) म्हणून साजरा केला जातो. हिंदू मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर अवतरते आणि आशिर्वाद देते त्यामुळे ही रात्र जागवली जाते. मग अशा ता मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना , मित्रमंडळींना देत कोजागिरी पौर्णिमा थोडी खास करू शकता. यासाठी लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेली काही मराठमोळी शुभेच्छापत्रं, Wishes, Images, Greetings, Quotes शेअर करून या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकाल.
पौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीचा जन्मदिवस आहे. या दिवशी लक्ष्मी माता समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. तसेच त्याच्या किरणांमध्ये विशेष अमृतमयी गुण असतात. त्यामुळे अनेकजण कोजागिरीच्या रात्री मंद चंद्रप्रकाशामध्ये बसून रात्र जागवतात. यंदा ही कोजागिरी पौर्णिमा शनिवार, 28 ऑक्टोबर दिवशी आहे. नक्की वाचा: Kojagiri Purnima 2023 Date: येत्या 28 ऑक्टोबरला साजरी केली जाणार कोजागिरी पौर्णिमा; जाणून घ्या शुभ मुहूर्तासह धार्मिक महत्व .
कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा

शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र,
चंद्राच्या मंद प्रकाशात साजरी करू एकत्र,
दूध साखरेचा गोडवा नात्यामध्ये येऊ दे
आनंदाची उधळण आपल्या जीवनी होऊ दे
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

पांढऱ्या शुभ्र दुधात दिसे पौर्णिमेचे चांदणं
वाढो स्नेह मनातला, जसा वाढतो कोजागिरीचा चंद्र
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साय,
प्रकाशमय करणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात वाढवू ऋणानुबंधांची साथ
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभ्र प्रकाश चंद्र-चांदण्यांचा,
सोबतीला बेत आहे केशरी दूधाचा…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

चंद्राच्या साथीने मिळाली बासुंदीची मेजवानी,
कोजागिरीच्या रात्री लिहिली जागरणाची कहाणी
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरीच्या रात्री मसाला दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवून पिण्याची रीत आहे. मसाला दूधासोबतच अनेकजण दूधापासून खीर किंवा त्यासारखे काही पदार्थ बनवतात आणि त्याचा आस्वाद घेतात.