कोरोना विषाणूचा संसर्ग असूनही 2020 मध्ये देशात अब्जाधीशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील वर्षी, देशाला 40 नवीन अब्जाधीश मिळाले असून ज्यामुळे देशातील एकूण अब्जाधीशांची संख्या 177 झाली आहे. Hurun Global Rich List आकडेवारीनुसार मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि 2020 मध्ये त्यांची संपत्ती 24% वाढली आहे