Gautam Adani at Maha Kumbh Mela 2025: प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ मेळा 2025 मध्ये अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सेवा कार्यात सहभाग घेतला. महाकुंभमेळ्याला देशभरातून आणि जगभरातून लोक येत आहेत. अलीकडेच, अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल यांनी प्रयागराज येथे पोहोचून महाकुंभमेळा 2025 मध्ये भाग घेतला. भाविकांसाठी तयार करण्यात येणाऱ्या महाप्रसादाच्या कामात गौतम अदानी सहभाग घेतला. त्यानंतर महाप्रसाद ग्रहण केला. प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात गौतम अदानी त्यांच्या पत्नीसह सहभागी झाले होते. यावेळी, दोघेही भाविकांना महाप्रसादाचे वाटप करताना दिसले.
Uttar Pradesh: Adani Group Chairman Gautam Adani, along with his wife Priti Adani, Chairperson of the Adani Foundation, visits the ISKCON VIP tent in Sector 18 of #Mahakumbh2025 pic.twitter.com/188Qz3xyM6
— IANS (@ians_india) January 21, 2025
मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत
प्रयागराज विमानतळावर प्रयागराजचे डीएम रवींद्र कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. गौतम अदानी विमानतळावरून थेट महाकुंभमेळा परिसरात पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रीती अदानी देखील उपस्थित होत्या. सकाळी साडेअकराच्या सुमारास बामरौली सिव्हिल विमानतळावरून बया रोड सेक्टर-19 येथील इस्कॉन पंडालमध्ये पोहोचले.
View this post on Instagram
कुटुंबासह भंडारा येथे सेवा दिल्यानंतर. दुपारी 1.55 वाजता, संगम स्नानासाठी घाटावर पोहोचले. कडक सुरक्षा व्यवस्थेत संगम स्नानासाठी रवाना झाला. तिथे स्नान केल्यानंतर, गौतम अदानी आणि त्यांचे कुटुंब बडे हनुमान जी मंदिर कॉरिडॉरवर पोहोचले. तिथे बडे हनुमानजींचे दर्शन घेतले आणि त्यांची पूजा केली आणि आरती केली.