मे महिन्याचा दुसरा रविवार म्हणजे 'जागतिक मातृदिन.' आईवरचं प्रेम साजरं करण्याचा हा दिवस.रोजच्या धावपळीत आपण अनेक गोष्टी गृहित धरतो आणि आईला तर अगदी हक्काने. त्यामुळे तिचं प्रेम, वात्सल, त्याग, वेदना लक्षात घेण्यासाठी, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस तर असायलचा हवा. तोच हा दिवस म्हणजे मदर्स डे.