
Hanuman Jayanti 2025 Wishes in Marathi: धार्मिक ग्रंथांनुसार, हनुमान हे भगवान शिवाचे अवतार आहेत. सीता मातेने दिलेल्या वरदानामुळे ते अमर आहेत, म्हणजेच आजही ते कोणत्यातरी गुप्त ठिकाणी तपश्चर्या करत आहेत. दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती (Hanuman Jayanti 2025) साजरी केली जाते, याला हनुमान जयंती आणि हनुमान प्रकटोत्सव असेही म्हणतात. यंदा शनिवार 12 एप्रिल 2025 रोजी हनुमान जयंती साजरी होत आहे. यंदा चैत्र पौर्णिमा 12 एप्रिल, शनिवारी सकाळी 3.21 वाजता सुरू होईल आणि 13 एप्रिल, रविवारी सकाळी 5.52 पर्यंत असणार आहे. उदयतिथीनुसार 12 एप्रिल रोजी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जाईल.
हिंदू पौराणिक कथांनुसार, हनुमानाचा जन्म आई अंजना आणि वडील केसरी यांच्या पोटी झाला. हनुमान हे श्रीरामांचे परमभक्त आणि शक्ती, बुद्धी आणि निष्ठेचे प्रतीक मानले जातात. या दिवशी भक्त उपवास करतात, मंदिरात जाऊन पूजा करतात आणि हनुमान चालीसाचे पाठन करतात, ज्यामुळे साहस आणि संकटमुक्तीचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते. हनुमानाचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झाला अशी मान्यता आहे, म्हणून या दिवशी पहाटेपासून मंदिरांमध्ये कीर्तन आणि प्रवचने सुरू होतात.
भक्त हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर लावतात आणि लाडू, केळी यांसारखे नैवेद्य अर्पण करतात. शेंदूर लावण्याची परंपरा श्रीरामांवरील भक्तीतून आली आहे. असे सांगितले जाते की, सीतेने शेंदूर लावल्याचे पाहून मारुतीरायानेही स्वतःच्या संपूर्ण शरीरावर शेंदूर लावले होते, जेणेकरून श्रीरामांचे आयुष्य दीर्घ होईल.
अशा या खास प्रसंगी Messages, Wishes, WhatsApp Status, HD Images द्वारे शुभेच्छा देत साजरी करा हनुमान जयंती. (हेही वाचा: April 2025 Festival Calendar: एप्रिल महिन्यात राम नवमी, हनुमान जयंतीपासून ते अक्षय तृतीयेपर्यंत साजरे होणार 'हे' प्रमुख व्रत आणि सण)





दरम्यान, भगवान हनुमानजी हे श्री रामांचे सर्वात मोठे भक्त आहेत. त्यांच्या मदतीने, भगवान श्रीरामांनी रावणाला मारले आणि सीता माईला अयोध्येत परत आणले. देवाप्रती असलेली अढळ भक्ती आणि अफाट शक्तीसाठी ओळखले जाणारे हनुमान हे धैर्य, निस्वार्थ सेवा आणि भक्तीचे प्रतीक आहे. असे समजले जाते की, त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि नकारात्मक उर्जेपासून संरक्षण मिळते.