Happy Mother's Day | File Image

मे महिन्याचा दुसरा रविवार हा मदर्स डे (Mother's Day) म्हणून साजरा केला जातो. यंदा हा मदर्स डे 11 मे दिवशी आहे. मदर्स डे चं औचित्य साधत आईच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. मदर्स डेचा उगम प्राचीन ग्रीसमध्ये झाला, जिथे मार्चच्या मध्यात रिया, देवतांची माता, उत्सव साजरा केला जात असे. ख्रिस्ती परंपरेने नंतर येशूची आई मेरीचा सन्मान करण्याचा एक मार्ग म्हणून हा उत्सव स्वीकारला आणि त्याचे नाव बदलून मदरिंग संडे असे ठेवले. युनायटेड स्टेट्समध्ये, मदर्स डे पहिल्यांदा 1908 मध्ये अॅना जार्विस यांनी साजरा केला. हा दिवस मातृदिन म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू केली, अशीही यामागील अख्यायिका आहे. मातृदिनाच्या दिवशी आईला खास मेसेज किंवा ग्रेंटिंज देऊन तुन्ही मातृदिनानिमित्त खास शुभेच्छा देऊ शकता. खालील Images, Facebook Messages, Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून तुम्ही आपल्या आईला आईची महती सांगणारे खास कोट्स शेअर करून मातृदिनाच्या खास शुभेच्छा देऊ शकता.

आई ही प्रत्येकाच्या आयुष्यातील हळवा कोपरा आणि खास महत्त्व असलेली व्यक्ती असते. ज्या व्यक्तीचे ऋण कधी फेडता येऊ शकत नाही अशा व्यक्तींमध्ये आई असते. त्यामुळे किमान मदर्स डे चं औचित्य साधत तिच्यासाठी आजचा दिवस थोडा खास करायला विसरू नका. नक्की वाचा: Mother's Day Card Ideas For Kids: Mother's Day निमित्त हाताने बनवा हटके ग्रीटिंग, इथे पाहा व्हिडीओ.

मदर्स डे च्या शुभेच्छा

Happy Mother's Day | File Image
Happy Mother's Day | File Image
Happy Mother's Day | File Image
Happy Mother's Day | File Image
Happy Mother's Day | File Image

 

मदर्स डे साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे आईच्या बिनशर्त प्रेम, काळजी आणि मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करणे. आपल्या जीवनाला आकार देण्यामध्ये आईची महत्त्वाच्या भूमिकेची असते. त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ मातृदिन साजरा करणं एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाही.