मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे स्थानकाला महाराष्ट्रातील पहिले हरित रेल्वे स्थानकाचा मान मिळाला आहे. भारतीय उद्योग संघटनेच्या इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलच्या (IGBC) रेटिंगनुसार सुवर्ण प्रमाणपत्र देण्यात आले आहे.