शाओमीच्या रेडमी नोट 7 प्रो आणि रेडमी नोट 7 या स्मार्टफोन्सचा आजपासून सेल सुरु होत असून हे मोबाईल्स तुम्हाला फ्लिपकार्ट आणि Mi.com वर उपलब्ध आहे. आज दुपारी 12 वाजल्यापासून हा सेल सुरु होईल.
रेडमी नोट 7 प्रो स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटचा पुन्हा एकदा सेल सुरु झाला आहे. गेल्या आठवड्यातच कंपनीकडून हे वेरिएंट उपलब्ध करण्यात आले होते. तर रेडमी नोट 7 आणि रेडमी नोट 7 प्रो हे दोन्ही स्मार्टफोन्स फेब्रुवारीत लॉन्च झाले आहेत.
रेडमी नोट 7 प्रो आणि रेडमी नोट 7 ची किंमत
शाओमी रेडमी नोट 7 स्मार्टफोनमध्ये 3 जीबी रॅम आणि 31 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 9999 रुपये आहे. तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 11,999 रुपये आहे. रेडमी नोट 7 प्रो स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 13,999 रुपयांना उपलब्ध आहे. तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे.
रेडमी नोट 7 प्रो आणि रेडमी नोट 7 चे फिचर्स
डुअल सिम सपोर्ट करणारा हा स्मार्टफोन अॅनरॉईड 9 वर आधारीत मीयूआयवर काम करतो. यात फोनमध्ये 6.3 फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रेगन 675 प्रोसेसर देण्यात आला असून त्यात 4 जीबी रॅम आणि 6 जीबी रॅमचा पर्याय देण्यात आला आहे.
रेडमी नोट 7 प्रो ड्युअर रिअर कॅमेरा सेटअपसह उपलब्ध आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. यात फ्रंट कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे. तर 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. ही मेमरी तुम्ही मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 256 जीबी पर्यंत वाढवू शकता.
रेडमी नोट 7 मध्ये 6.3 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर दिला असून यात 3 जीबी रॅम आणि 4 जीबी रॅम देण्यात आला आहे. यात 12 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी लेन्स असलेला डुअल कॅमेरा देण्यात आला आहे. तर 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 4000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली असून क्विक चार्ज 4 सपोर्ट सह हे स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत.