Xiaomi कंपनी बनवणार फोल्डेबल स्मार्टफोन? पाहा व्हिडिओ
फोल्डेबल स्मार्टफोन (फोटो सौजन्य- ट्विटर)

सॅमसंग (Samsung) या कंपनीने गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy F मॉडेल दाखविले होते. मात्र सध्या Xiaomi कंपनीचा स्मार्टफोनच्या बाबतीतला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायर झाला आहे. ट्विटरवर Evan Blass या तरुणाने ट्विट करुन त्यात सुपर फ्लेक्झिबल स्क्रिन असणारा फोन दाखवण्यात आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 19 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये एक टॅब आधी दाखवला असून नंतर तो फोल्ड केला जात असल्याचे दिसत आहे. या फोनचे आयकॉन शाओमीच्या MIUI सोबत मिळतेजुळते आहे. तर व्हिडिओ हा अंधारात शूट केल्याने नक्की शाओमी कंपनीचा आहे का ही शंका बाळगली जात आहे. यामध्ये फोनची स्क्रिन तीन भागात विभागली जात असून फ्लेक्झिबल डिस्प्ले दाखवण्यात आला आहे. (हेही वाचा- जगातील पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लॉंच, जाणून घ्या काय आहेत फीचर्स)

परंतु ट्विटरवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओतील तरुणाने अद्याप कंपनीच्या मॉडेलबद्दल खुलासा केला नाही आहे. तर सॅमसंग कंपनीपेक्षा वेगळे असे या स्मार्टफोनचे मॉडेल असल्याचे सांगितले जात आहे.