गेल्या कित्येक महिन्यांपासून सॅमसंगने आपण बाजारात फोल्डेबल स्मार्टफोन घेऊन येत असल्याचा गाजावाजा केला होता. मात्र याबाबत सॅमसंगकडून कोणतीही हालचाल झाली नाही. सॅमसंगचे सीइओ डीजे कोह यांनी काही दिवसांपूर्वी सॅमसंग त्यांचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन पुढील महिन्यात सादर करेल असे सांगितले होते, मात्र आता चीनची स्मार्टफोन कंपनी रोयु (roayu) ने सॅमसंगच्या नाकावर टिच्चून ग्राहकांचे फोल्डेबल स्मार्टफोनचे स्वप्न पूर्ण केले आहे. गुरुवारी चीनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात या कंपनीने जगातला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन फ्लेक्स पाय (flex pai) सादर केला आहे. चला पाहूया या नव्या फोल्डेबल स्मार्टफोनची काय आहे खासियत
> टॅब्लेटसारखा दिसणारा हा स्मार्टफोन 7.8 इंचाचा आहे. मात्र जेव्हा तुम्ही तो फोल्ड कराल तेव्हा त्याची स्क्रीन ही छोट्या फोनइतकी म्हणजेच 4 इंच होईल. त्यामुळे हा फोन तुम्ही अगदी आपल्या खिशाताही ठेऊ शकणार आहात. स्क्रीनच्या स्पेशल फिचरमुळे हा फोन तुम्हाला दुमडता येणार आहे.
> हा फोन आपल्या नेहमीच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चाणार नाही, तर या फोनसाठी खास वेगळी ऑपरेटिंग सिस्टीम तयार करण्यात आली आहे, ज्याचे नाव आहे Water OS.
> सध्या हा फोन दोन व्हेरीयंटमध्ये उपलब्ध आहे, 6GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 128GB or 512GB स्टोरेज.
> या फोनमधील प्रोसेसरदेखील जगातील अशा प्रकारचा पहिला प्रोसेसर आहे, या फोनमध्ये 7mm जाडीचा स्नॅपड्रॅगन 8150 प्रोसेसर
> याशिवाय कंपनीने मोबाईल चार्जिंगसाठी आरओ तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या द्वारे 0 ते 80 टक्के बॅटरी केवळ तासाभरात चार्ज होते.
> यामध्ये प्रायमरी 16 मेगापिक्सल आणि सेकंडरी 20 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.
या फोनची सध्याची बाजारातील किंमत ही साधारण 95,000 रुपये इतकी आहे.