Xiaomi ला भारतात 5 वर्ष पूर्ण झाल्याने, कंपनी ग्राहकांना परत करणार 500 कोटी रुपये
Xiaomi Gift (Photo Credits: Twitter)

मोबाईल फोन्सच्या विश्वात सध्या टॉप कंपन्यांमध्ये असलेलं एक नाव म्हणजे शाओमी. या कंपनीला भारतात लवकरच 5 वर्ष पूर्ण होणार आहेत. आणि याचंच औचित्य साधून शाओमी कंपनीने ग्राहकांसाठी काही खास ऑफर्स जाहीर केल्या आहेत.

शाओमी कंपनी ग्राहकांना खूपच कमी किंमतीत फोन देणार असल्याचे कंपनीचे भारतचे व्यवस्थापकीय संचालक मनु कुमार जैन यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून नुकतेच जाहीर केले आहे.

पहा त्यांचे ट्विट,

त्यांनी आपल्या ट्विटमधून सर्वात आधी ही वेळ सरप्राईझ देण्याची आहे असं लिहिलं आहे. तसेच 'तुम्ही आम्हाला पाच वर्षात बरेच काही दिल्याने शाओमी कंपनीने त्याबदल्यात ग्राहकांना 500 कोटी रुपये परत करण्याचे ठरवले आहे', असं म्हणत ग्राहकांचे आभार मानले आहेत. नंतर खऱ्या सरप्राईझ विषयी ते लिहितात की, शाओमीच्या पहिल्या 50 लाख ग्राहकांना रेडमी 8 या मॉडेलचा 4 जीबी प्लस 64 जीबी स्टोरेजचा फोन केवळ 7 हजार 999 रुपयांना देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे, तसेच ज्या ग्राहकांनी 3 जीबी रॅमचा फोन ऑर्डर केला आहे. त्या सर्वांच्या फोनमध्ये 4 जीबी रॅमचे अपग्रेड करण्यात येणार आहे.

नक्की वाचा: Redmi 8 मध्ये युजर्सला मिळणार हे दमदार फिचर्स

या ट्विटनंतर लगेचच शाओमीच्या ग्राहकांमध्ये उत्साह पसरला व अनेकांनी शाओमीला 5 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छ देखील दिल्या.