प्रतिकात्मक फोटो | (Archived, edited, representative images)

शाओमी (Xiaomi) कंपनीने त्यांचा Mi Tv Q1 लॉन्च केला आहे. हा टीव्ही 75 इंचाच्या स्क्रिन साइजमध्ये येणार आहे. याची किंमत EUR 1,299 म्हणजेच 1,14,300 रुपये आहे. स्मार्ट टीव्हीची विक्री मार्च 2021 पासून सुरु होणार आहे. या टीव्ही सुरुवातीला काही निवडक ठिकाणी सेलसाठी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. Mi स्मार्ट टीव्हीला इंट्रोडक्टरी प्राइसवर EUR 999 (जवळजवळ 87,900 रुपये) खरेदी करता येणार आहे. परंतु सेल वेळीच ही ऑफर लागू असणार आहे.(Mi10 स्मार्टफोनच्या किंमतीत घट, जाणून घ्या नवी किंमतीसह खासियत)

या स्मार्ट टीव्हीटी साइज 35 इंचाचा टीव्हीपेक्षा दुप्पट असणार आहे. यामध्ये OLED 4K डिस्प्लेचा सपोर्ट दिला गेला असून उत्तम पिक्चर क्वालिटी मिळणार आहे. त्यामुळे अत्यंत बारीक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे दिसून येणार आहे. स्मार्ट टीव्ही लेटेस्ट अॅन्ड्रॉइड 10 बेस्ड असणार आहे. Mi TV मध्ये 178 डिग्री व्हू अँगल मिळणार आहे. म्हणजेच स्मार्ट टीव्ही तिरका आणि कोपऱ्यातून सुद्धा पाहता येणार आहे.

एमआयच्या नव्या स्मार्ट टीव्हीमध्ये 7000000 अधिक चित्रपट आणि टीव्ही शो फ्री मध्ये पाहता येणार आहे. त्याचसोबत Google Play Store वर सध्या 5,000 अॅपच्या माध्यमातून सुद्धा चित्रपट आणि शो पाहता येणार आहेत. त्याचसोबत स्मार्ट रिमोट कंट्रोल सु्द्धा दिला गेला असून Netflix, YouTube आणि Amazon Prime Video साठी वेगळे बटण दिले गेले आहे. त्याचसोबत टीव्ही मध्ये वॉइस कंट्रोल फंक्शनसाठी बिल्ड इन मायक्रोफोन सपोर्ट दिला आहे.(Xiaomi भारतीय बाजारात आणणार Air Charger, हवेमध्ये चार्ज होणार तुमच्या मोबाईलसह अन्य इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स)

Mi Tv Q1 मध्ये 75 इंचाचा QLED 4K UHD रेजॉल्यूशनसह येणार आहे. यामध्ये क्वांटम डॉट टेक्नॉलॉजीचा सपोर्ट दिला गेला आहे. स्मार्ट टीव्ही 120Hz रिफ्रेश रेटसह येणार आहे. स्मार्ट टीव्हीत 1.07 बिलियन कलर वाइब्रेशन, 1024 कलर शेड्स आणि 10,001:1 कॉन्ट्रॉस्ट रेश्योचा सपोर्ट दिला आहे. तर Dolby Vision आणि HDR 10+ सपोर्टसह येणार आहे. टीव्हीच्या कनेक्टिव्हिटी बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये एक HDMI 2.1 पोर्ट दिला जाणार आहे. त्याचसोबत दोन HDMI 2.0 पोर्ट, दोन USB 2.0 पोर्ट, ड्युअल बँड Wifi, ब्लूटूथ V5, एक 3.5mm ऑडिओ जॅक, LAN/इथरनेटचा सपोर्ट मिळणार आहे. स्मार्ट टीव्हीमध्ये एक लो लेंटेसी मोड दिला असून जो खासकरुन गेमिंग आणि स्ट्रिमिंगसाठी दिला आहे.