चीनी स्मार्टफोन निर्मती कंपनी शाओमीने त्यांच्या फ्लॅगशिप मधील स्मार्टफोन Xiaomi Mi10 च्या किंमतीत घट केली आहे. कंपनीच्या या प्रीमियम स्मार्टफोनची किंमत 5 हजारांनी कमी करण्यात आली आहे. हे स्मार्टफोन दोन वेरियंटमध्ये उपलब्ध करुन दिला जाणार आहे. दोन्ही स्मार्टफोनच्या किंमतीत घट करण्यात आली आहे. शाओमीच्या या स्मार्टफोनची खासियत अशी की त्याला 108 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला गेला आहे. फोनच्या 8GB RAM आणि 128GB वेरियंटला 49,999 रुपयांत लॉन्च करण्यात आला होता.(Xiaomi भारतीय बाजारात आणणार Air Charger, हवेमध्ये चार्ज होणार तुमच्या मोबाईलसह अन्य इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स)
परंतु स्मार्टफोनची किंमत कमी झाल्यानंतर 44,999 रुपयांना उपलब्ध होणार आहे. तर 8GB रॅम आणम 256GB वेरियंट 54,999 रुपयांत लॉन्च केला होता. तो आता 49,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. शाओमी एमआय10 च्या नव्या किंमती कंपनीच्या वेबसाइटवर पाहता येणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन कोरल ग्रीन आणि ट्वाइलाइट ग्रे रंगात ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
Xiaomi Mi10 च्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास त्यात 6.67 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. ज्यामध्ये 1080X2340 पिक्सल रेजॉल्यूशन दिले आहे. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे कोटिंग दिले गेले आहे. फोनच्या प्रोसेसरसाठी फोनमध्ये स्नॅपड्रॅगनचा ऑक्टा कोर 865 चिपसेट दिला आहे. फोनमध्ये 8GB रॅम दिला आहे. फोन 128जीबी आणि 256 जीबी च्या दोन स्टोरेज मध्ये येणार आहे.(Poco M3 स्मार्टफोन 6000mAh बॅटरीसह भारतात होणार लाँच; जाणून घ्या संभाव्य किंमत आणि खास फिचर्स)
शाओमीचा हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड 10 वर आधारित आहे. फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आणि इनफ्रारेड दिला आहे. हा ड्युअल सिमला सपोर्ट करणार आहे. याच्या रियरमध्ये चार कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सल आहे. जो f/1.69 अपर्चरसह येणार आहे. 13 मेगापिक्सलचा 123 डिग्री अल्ट्रा वाइस लेन्स दिली आहे. 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स दिला आहे. फ्रंटला 20 सेल्फी शूटर कॅमेरा दिला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 4780 mAh ची बॅटरी 30W च्या फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणार आहे. यामध्ये 10W वायरलेस रिवर्स चार्जिंग सुद्धा दिले आहे.