Twitter New CEO: Linda Yaccarino कोण आहे? Twitter च्या संभाव्य नवीन CEO लिंडा याकारिनोबद्दल तुम्हाला 'या' गोष्टी माहित आहेत का? जाणून घ्या
Linda Yaccarino (PC -Twitter/@lindayacc)

Twitter New CEO: ट्विटरचे मालक एलोन मस्क (Elon Musk) यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. मस्क यांनी ट्विट केले की ते लवकरच ट्विटरचे सीईओ पद सोडणार आहेत. तसेच सध्या नवीन सीईओच्या नावाच्या चर्चाही रंगल्या आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलनुसार, एनबीसी युनिव्हर्सल जाहिरात प्रमुख लिंडा याकारिनो (Linda Yacarino) यांना ट्विटरचे सीईओ पद (CEO) दिले जाऊ शकते.

मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, नवीन सीईओची निवड केल्याचा मला खूप आनंद आहे. मस्क यांच्या मते, नवीन सीईओ 6 आठवड्यांच्या आत पदभार स्वीकारतील. यामुळे ट्विटरवर मस्कची भूमिका कार्यकारी अध्यक्ष आणि सीटीओ अशी असेल. (हेही वाचा - Elon Musk to Step Down Twitter: एलन मस्क होणार पायऊतार, ट्विटरला सहा आठवड्यात मिळणार नवा CEO)

लिंडाच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ती 2011 पासून एनबीसी युनिव्हर्सल कंपनीमध्ये काम करत आहे. कंपनीतील तिची सध्याची भूमिका ग्लोबल अॅडव्हर्टायझिंग अँड पार्टनरशिप विभागाच्या अध्यक्षा आहे. याआधी त्यांनी कंपनीच्या केबल एंटरटेनमेंट आणि डिजिटल जाहिरात विक्री विभागातही काम केले आहे.

याआधी लिंडा याकारिनो यांनी टर्नर कंपनीत 19 वर्षे काम केले. येथेही त्यांनी जाहिरात विक्री, विपणन आणि संपादन विभागात कार्यकारी उपाध्यक्ष म्हणजेच सीओओ जाहिरात म्हणून काम केले. लिंडा ही पेन स्टेट युनिव्हर्सिटीची माजी विद्यार्थी असून, लिबरल आर्ट्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये प्रमुख आहे.

बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, याकारिनोने यापूर्वी तिच्या मित्रांना सांगितले होते की, तिला ट्विटरची सीईओ बनण्याची इच्छा आहे, जी मस्क लवकरच पूर्ण करू शकतील. मस्कच्या समर्थक राहिलेल्या लिंडा म्हणाल्या की, मस्कला आपली कंपनी सुधारण्यासाठी तिला वेळ देण्याची गरज आहे.