WhatsApp युजर्ससाठी महत्त्वाची बातमी! 'हे' काम न केल्यास अकाऊंट होईल डिलीट
WhatsApp Logo (Photo Credits: Pixabay)

व्हॉट्सअॅपने (WhatsApp) आपल्या टर्म्स ऑफ सर्व्हिसेस (Terms of Service) आणि प्रायव्हसी पॉलिसीमध्ये (Privacy Policy) नवीन बदल केले आहेत. भारतातील लाखो युजर्संना व्हॉट्सअॅपमध्ये एक नवीन in app नोटीफिकेशन दिसेल. हे in app नोटीफिकेशन जगभरातील कोट्यावधी युजर्संसुद्धा दिसणार आहे. जर हे टर्म्स आणि कंडिशन्स जे युजर्स 8 फब्रुेवारीपर्यंत स्वीकारणार नाहीत त्यांचे अकाऊंट  डिलीट (Delet) होईल.

व्हॉट्सअॅपच्या या in app नोटीफिकेशनमध्ये काही महत्त्वाच्या बाबींबद्दल पॉईंटर्स देण्यात आले आहेत. यामध्ये व्हॉट्सअॅप युजरद्वारे डेटा कसा गोळा करतो आणि व्हॉट्सअॅपची फेसबुकसोबत असलेल्या पार्टनरशीपबद्दल माहिती दिली आहे. या अपडेटेड पॉलिसीमध्ये असे नमूद केले आहे की, व्हॉट्सअॅप ऑपरेट करण्यासाठी आणि कस्टमर सपोर्ट वाढवण्यासाठी युजरकडून काही माहिती कलेक्ट करु शकतो. तुम्ही व्हॉट्सअॅप कधी इंस्टोल केलं, व्हॉट्सअॅप सर्व्हीस कशी वापरता या बाबतची माहिती व्हॉट्सअॅप जतन करु शकतो. त्यासोबत व्हॉट्सअॅपद्वारे बिजनेस अकाऊंट सोबत होणाऱ्या देवाणघेवाणची सुद्धा व्हॉट्सअॅप नोंद ठेवू शकतो.

व्हॉट्सअॅपला माहिती देताना सर्व बिजनेस अकाऊंट्सना कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. व्हॉट्सअॅपच्या नवा टर्म्स कंडीशन्स आणि प्रायव्हसी पॉलिसी 8 फेब्रुवारीपर्यंत लागू होईल. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इतर थर्ड पार्टी सर्व्हिस कंपन्यांसोबत कार्यरत असून आपल्या सर्व्हिसेसची मार्केटिंग करण्यासाठी या डेटाचा वापर करु शकतो. (WhatsApp लवकरच सादर करणार multi-device support हे नवे फिचर; पहा काय आहे खासियत)

मेसेंजर, इन्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप एकत्रितरीत्या कनेक्ट होऊन कार्यरत व्हावे, यासाठी कंपनी उपाय शोधत आहे. या मर्जिंगनंतर अजून काही नवीन फिचर्स अॅड करण्याची घोषणा फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी ऑक्टोबरमध्ये केली होती. (WhatsApp Profile Photo कसा कराल हाईड; जाणून घ्या स्टेप्स)

तुमचे फेसबुक पेज अकाऊंट वापरुन व्हॉट्सअॅपवर तुम्ही पेमेंट करु शकता किंवा फेसबुक वरील मित्रांसोबत व्हॉट्सअॅपवरील चॅट्स वापरुन बोलू शकाल, असे नवे फिचर्स अॅड करण्यात येतील.