WhatsApp प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

काही दिवसांपासून जगभरात व्हॉट्सअ‍ॅपवरील (WhatsApp) जुने मेसेज आपोआप डिलिट होत असल्याची तक्रार युजर्स करत आहेत. व्हॉट्सअ‍ॅप या लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅपनेदेखील या तक्रारीची दखल घेत लवकरच बग (Bug)  फिक्स करण्यात येईल अशी माहिती ट्विटर हॅन्डलच्या माध्यमातून दिली आहे. आबालवृद्धांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) ची क्रेझ आहे. युजर्सनादेखील केवळ मेसेज पाठवण्यासाठी नव्हे इतर अनेक फीचर्स वेळोवेळी देण्यासाठी सतत अपडेट दिले जातात. मात्र सध्या एक बग व्हॉट्सअ‍ॅपसाठी डोकेदुखी ठरला आहे. त्यावर लवकरच उपाय काढला जाईल अशी माहिती व्हॉट्सअ‍ॅपकडून देण्यात आली आहे.

व्हॉट्सकडून देण्यात आली माहिती

मागील आठवड्याभरापासून युजर्स जुने मेसेज आपोआप डीलिट होत असल्याचं सांगत आहे. आम्हांला या समस्येची पूर्ण कल्पना आहे. यावरील कारण शोधून बग लवकरच फिक्स केला जाईल असे व्हॉट्सअ‍ॅपकडून सांगितलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचे जुने मेसेज का डीलिट होत असावेत?

तज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, वर्षभरापूर्वीच्या मेसेजचे बॅकअप घेण्यात यावेत असे सांगण्यात आले होते मात्र तसे न केलेल्या युजर्सचे जुने मेसेज गायब होत असावेत.लवकरच चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी फिंगरप्रिंट पर्याय देण्यात येणार आहे. त्यासाठी अपडेट रोलआऊट होणार आहे.