लोकप्रिय चॅट मेसेंजर व्हॉट्सअॅप पे (WhatsApp Pay) ने कॅशबॅक ऑफर (Cashback Offer) सादर केली आहे. प्रत्येक ट्रान्जॅक्शनवर 51 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. त्यात तुम्ही एखाद्याला किती पैसे ट्रान्सफर करता याची कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळे केवळ 1 रुपया ट्रान्सफर करुन तुम्ही 51 रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकता. ही प्रमोशनल ऑफर असल्याने पहिल्या 5 ट्रान्जॅक्शनवर उपलब्ध आहे. यातून तुम्हाला थेट 255 रुपये मिळू शकतात. हे पैसे तुमच्या WhatsApp Pay सेवेशी लिंक केलेल्या तुमच्या बँक खात्यात पैसे लगेच जमा केले जातील. मात्र ही ऑफर काही काळासाटी केवळ अॅनरॉईड स्मार्टफोन पुरतीच मर्यादीत आहे.
व्हॉट्सअॅप पे कॅशबॅक ऑफर:
WhatsApp Pay सेवा भारतात लॉन्च झाल्यापासून या ऑफरमुळे त्याचे चांगले प्रमोशन होणार आहे. यापूर्वी युजर्सकडून या सेवेला तितकासा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे नव्या युजर्सचे लक्ष वेधून घेण्यासाठी ही अत्यंत चांगली ऑफर आहे. (भारतातील 'या' 4 मोठ्या बँकांसोबत WhatsApp Pay ची पार्टनरशीप; तब्बल 20 लाख युजर्संना घेता येईल डिजिटल पेमेंटचा लाभ)
WhatsApp Pay कसं सेट कराल?
# कोणत्याही WhatsApp chat मधील टेक्स एरिया मधील "Re" आयकॉनवर क्लिक करा.
# पेमेंट मेथड अॅट करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपकडून नोटीफिकेशन येईल. त्यावर क्लिक करा.
# यादीत असलेल्या बँकेच्या नावाची निवड करा.
# तुमचा व्हॉट्सअॅप नंबर तुमच्या बँकेच्या नोंदणीकृत मोबाईल फोनशी जुळतो का हे दोनदा तपासा.
# त्यानंतर तुमची ओळख पटवून घेण्यासाठी तुमच्या फोनवर SMS येईल.
# तुमच्याकडे आधीच UPI पिन असल्यास, तुमची सेवा सक्रिय करण्यासाठी तुम्हाला आता फक्त तो प्रविष्ट करावा लागेल. जर तुम्ही पहिल्यांदा UPI वापरत असाल, तर तुम्हाला नवीन पिन तयार करावा लागेल.
यापूर्वी गुगल पे ने युजर्संना आकर्षित करण्यासाठी ही ऑफर सादर केली होती. प्रत्येक ट्रान्जॅक्शननंतर युजर्संना scratch card मिळत असे. त्यात कॅशबॅक, कूपन्स आणि इतर फायदे दिले जात. अजूनही ही रिव्हॉर्ड्स पद्धत गुगल पे कडे कायम आहे. त्याचबरोबर फोन पे ने देखील युजर्संना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारची कॅशबॅक ऑफर सादर केली होती.