WhatsApp Pixabay

मेटा कंपनीकडे स्वामित्व हक्क असलेले आणि तुम्ही नियमीतपणे स्मार्टफोनमध्ये वापरत असलेले व्हॉट्सअॅप लवकर एक नवे फीचर घेऊन येत आहे. हे फीचर खास करुन अँड्रॉइडवरील कॉल नोटिफिकेशन्समध्ये 'मेसेजसह रिप्लाय' (Reply with a Message) सेवा उपलब्ध करुन देईल. वृत्तसंस्था आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसारल कंपनी लवकरच हे फीचर अनेक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवणार आहे. या नव्या फीचरचा अनेक वापरकर्त्यांना फायदा होईल, असे टेक विश्वातील अभ्यासरकांचे निरीक्षण आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांना येणारा कॉल सहजपणे नाकारण्याची आणि त्याच वेळी कॉलरला संदेश पाठविण्यास अनुमती देईल. शिवाय व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना आता इनकमिंग कॉल नोटिफिकेशन्सवर एक नवीन "रिप्लाय" बटण दिसेल. ज्यामुळे नकार किंवा रिप्लाय देणे सुलभ होईल.

ट्विट

व्हॉट्सअॅपचे नवे फीचर वापरकर्ता जेव्हा व्हॉट्सअॅप कॉलला उत्तर देऊ शकत नाही, अशा वेळी फायद्याचे ठरु शकेल. जसे की, वापरकर्ता काही कामात, बैठकीत अथवा इतर काही कारणांनी व्यग्र असेल तेव्हा त्याला कॉल घेणे शक्य नाही. अशा वेळी हे फीचर काम करेल.