सोशल मीडिया (Social Media) मेसेजींग अॅप व्हाट्सअॅप (WhatsApp लवकरच आपल्या ग्राहकांसाठी नवे फिचर्स (WhatsApp New Features) घेऊन येण्याची शक्यता आहे. या नव्या फिचर्समुळे युजर्सला अनेक गोष्टी सोप्या होणार असल्याचे सांगितले जात आहे. ज्यात ग्रुप कॉल शर्टकटचाही समावेश आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हाट्सअॅप ने नुकतेच आपले 2.21.19.15 बीटा वर्जन अपडेट केले आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तांचा आधार घ्यायचा तर नव्या फीचर्सध्ये ग्रुप कार्ड च्या माध्यमातून ग्रुप कॉल करणे अत्यंत सोपे होणार आहे. तसेच या अपडेटमध्ये वॉईस कॉल आणि व्हिडिओ कॉल शॉर्टकटही मिळणार आहे.
यूजर्स जेव्हा कॉन्टैक्ट कार्ड पाहतील तेव्हा त्यांना शार्टकट पाहायला मिळेल.ज्या बीटा यूजर्सला हे अपडेट दिसणार नाही त्यांना काही काळ नव्या फिचर्ससाठी वाट पाहावी लागू शकते. WhatsApp बीटा एंड्रॉयड 2.21.3.13 साठी नवे फिचर 'Mute Video' सादर केले आहे. मीडिया रिपोटनुसार iOS लवकरच कॉल लावण्यापूर्वी व्हिडिओ म्यूट करु शकतील. अँड्रॉयल यूजर्ससाठी हे फीचर रोलआऊट करण्यात आले आहे. याच्या 7 महिन्यांंनतर iOS यूजर्ससाठीही हे लॉन्च करण्यात येईल. (हेही वाचा, WhatsApp वरील जुने आणि डिलीट झालेले मेसेज पुन्हा कसे मिळवाल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स)
WABetaInfo ने दिलेल्या माहितीनसार, वॉट्स म्यूट वीडियो लवकरच iOS यूजर्ससाठी उपलब्ध करुन दिला जाईल. दरम्यान, त्यासाठी एंड्रॉयड यूजर्स साठी हे फिचर सुरु करण्यात आले आहे. यूजर्स व्हिडिओ GIF मध्येही बदलू शकतात तसेच रिवाइज्ड टॉगल मध्ये म्यूट वीडियो ऑप्शन पाहू शकतात असे WABetaInfo ने म्हटले आहे. WhatsApp च्या मल्टी डिवाइस सपोर्ट सोबत आपण एक नॉन फोन डिवाईस जसे की लॅपटॉप आदींमध्ये WhatsApp चालवू शकता. त्यासाठी आपल्याला आपला फोन ऑनलाईन ठेवण्याचीही आवश्यकता नाही.
WhatsApp च्या मल्टी डिवाइस बीटा वापरासाठी आपल्याला App स्टोअरवरुन WhatsApp चे लेटेस्ट वह्जन इन्स्टॉल करावे लागेल. त्यांतर आपले लिंक्ड डिवाईस सेक्शन मल्टी डिवाइस प्रॉम्पट निवडू शकता. आता समान्य WhatsApp वेब प्रमाणे आपल्या फोनमधून डिवाईस QR कोड स्कॅन करा.