WhatsApp वरील जुने आणि डिलीट झालेले मेसेज पुन्हा कसे मिळवाल? जाणून घ्या सोप्या स्टेप्स
WhatsApp (Photo Credits: Pixabay)

व्हॉट्सअॅप (WhatsApp) हे मेसेजिंग अॅप (Messaging App) आता आपल्या जीवनाचा अभिवाज्य भाग बनला आहे. इन्स्टंट मेसेजिंग (Instant Messaging), व्हॉईस-व्हिडीओ कॉल (Voice-Video Call) आणि पेमेंट (Payment) यासाठी व्हॉट्सअॅप अगदी सर्रास वापरले जाते. व्हॉट्सअॅपमध्ये काम, व्यवसाय संबंधित महत्त्वपूर्ण माहिती असल्याने त्याचा बॅकअॅप ठेवणे महत्त्वाचे आहे.  (WhatsApp Update: 1 नोव्हेंबर 2021 पासून 'या' Android आणि iOS Smartphones मध्ये व्हॉट्सअ‍ॅप सपोर्ट होणार बंद; इथे पहा संपूर्ण यादी)

व्हॉट्सअॅप आपल्याला Google ड्राइव्ह आणि iCloud दोन्हीवर क्लाउड बॅकअप तयार करण्याची परवानगी देतं. प्रत्येक वेळी जेव्हा आपण नवीन स्मार्टफोन खरेदी करतो तेव्हा आपण बऱ्याचदा आपले सर्व जुने व्हॉट्सअॅप संदेश, प्रतिमा, मीडिया फाइल्स, कागदपत्रे आणि व्हिडिओ गमावतो आणि ते नंतर त्रासदायक ठरु शकतं.

डिलीट झालेले मेसेजेस पुन्हा मिळवण्याचे कोणतेही अधिकृत फिचर व्हॉट्सअॅपकडे नाही. परंतु, थर्ड पार्टी अॅपच्या माध्यमातून हे मेसेजेस पुन्हा मिळवता येतील. या अॅपचे नाव आहे- WhatsRemoved+. जुने आणि डिलीट झालेले मेसेजेस पुन्हा मिळवण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा:

# तुमच्या WhatsApp अकाऊंटचा चॅट ऑप्शन 'Daily' वर सेट केल्या असल्याची खात्री करा. यामुळे डिलीट मेसेजेस मिळवण्याची प्रक्रीया सुलभ होईल. कारण यामुळे चॅट्सचा बॅकअप नियमितपणे ठेवला जातो. जेव्हा आपण नवीन स्मार्टफोनवर स्विच करतो किंवा आपले व्हॉट्सअॅप अकाउंट डिलीट करतो, तेव्हा डिलीट केलेले व्हॉट्सअॅप मेसेज पुनर्प्राप्त करणे महत्त्वाचे असते.

# गुगल प्ले स्टोअरवरुन व्हॉट्सअॅप डाऊनलोड करा आणि रजिस्ट्रर फोन नंबर एंटर करुन तुमच्या अकाऊंटमध्ये लॉग इन करा.

# त्यानंतर तुम्हाला 'Restore all your WhatsApp Chats' हा ऑप्शन दिसेल.

# त्या 'Restore' ऑप्शनवर क्लिक करा. तुम्हाला तुमचे जुने आणि डिलीट झालेले मेसेजेस पुन्हा मिळतील. परंतु, शेवटच्या बॅकअपनंतर एखादा नवीन मेसेज आला असल्यास तो तुम्हाला नवीन फोनमध्ये मिळणार नाही.

# जर तुम्ही चुकून काही व्हॉट्सअॅप मेसेज डिलीट केले असतील आणि ते परत रिस्टोअर करायचे असतील, तर तुम्हाला व्हॉट्स अॅप अनइन्स्टॉल करावे लागेल आणि ते पुन्हा इन्स्टॉल करावे लागेल. त्यानंतर वरील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. परंतु आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की, आपला स्मार्टफोन स्थिर वाय-फाय नेटवर्कशी जोडलेला आहे जेणेकरून पुनर्संचयित प्रक्रिया आपल्या मोबाईल डेटाचा जास्त वापर करू नये.

व्हॉट्सअॅप चॅट बॅकअप सेटिंग:

WhatsApp Chat Backup सुरु करण्यासाठी व्हॉट्सअॅप ओपन करा आणि Settings पर्यायावर जा. त्यानंतर 'Chats' वर जा आणि 'Chat backup' वर क्लिक करा. व्हॉट्सअॅपचा चॅट बॅकअप कधी करावा, हे तुम्ही स्वत: निवडू शकता. auto-chat backup setting मध्ये जावून Daily, Monthly, Weekly and OFF असे पर्याय सिलेक्ट करु शकता. परंतु, यापैकी जर तुम्ही OFF चा पर्याय निवडलात तर नवीन स्मार्टफोनवर स्वीच करताना तुम्हाला तुमच्या जुन्या मेसेजचा बॅकअप मिळणार नाही.

जर तुम्ही आयफोन युजर्स असाल तर व्हॉट्सअॅपवरील सेटिंग्जमध्ये जा आणि चॅट्स पर्यायातून चॅट बॅकअप पर्याय निवडा. तुम्ही Auto Backup frequency किंवा Back Up Now हा पर्याय निवडून बॅकअप मॅन्युअली स्टार्ट करु शकता.