WhatsApp Crash Codes: व्हॉट्सअ‍ॅपवर युजर्सला येतेय एक विचित्र समस्या, मेसेज मिळाल्यानंतर क्रॅश होतोय App
WhatsApp (Photo Credit: File/PTI)

WhatsApp वर सध्या एक विचित्र समस्या उद्भवली असून त्या संदर्भात एक मेसेज सुद्धा येत आहे. हा मेसेज मिळाल्यानंतर अॅप क्रॅश किंवा फ्रिज होत आहे. तसेच मेसेज मोठा आणि स्पेशल कॅरेक्टर्सच्या मदतीने लिहिण्यात आला आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपला तो डिकोट करता येत नाही आहे. याच कारणास्तव अॅप क्रॅश होण्याची समस्या येत आहे. ब्राझीलसह जगातील अन्य काही देशातील युजर्सला सुद्धा ही समस्या भेडसावत येत आहे. या बद्दल रिपोर्ट सुद्धा करण्यात आला आहे. (Google ने Play Store वरुन हटवले हे धोकादायक Apps, तुम्ही सुद्धा करा डिलिट)

WABetaInfo ने त्यांच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, या मेसेजसाठी एका वेगळ्या कॅरेक्टर्सचा वापर केला जाणार आहे. त्याचा कोणताही अर्थ नाही आहे. तसेच रिपोर्टमध्ये पुढे असे ही त्यांनी सांगितले की, कोणता कॉन्टॅक्ट अशा पद्धतीचा मेसेज पाठवू शकतो त्यात या कॅरेक्टर्सचा वापर केलेला असावा. काही वेळेस व्हॉट्सअॅप सुद्धा मेसेज पूर्णपणे रेंडर करु शकत नाही. कारण त्याचे स्ट्रक्टचर पू्र्णपणे वेगळे असते. या मेसेजचे कॉम्बिनेशन एक अशी स्थिती निर्माण करतात त्यामुळे व्हॉट्सअॅप मेसेज प्रोसेस करु शकत नाही आणि तो पूर्णपणे क्रॅश होतो.

अॅप क्रॅश झाल्यानंतर तो सुरु करण्यास काही वेळ लागतो. जरी तुम्ही वारंवार ते सुरु करण्याचा प्रयत्न केला तरीही ते बंदच राहते. यामुळे जगभरातील युजर्सने रिपोर्ट केला आहे. परंतु ब्राझीलच्या युजर्सला याची अधिक समस्या उद्भवत आहे. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, मेसेज वर्चुअल कार्ड (vcard) च्या रुपात पाठवले जात आहे. WABetaInfo यांनी असे म्हटले की, जर तुम्हा हा वर्चुअल कार्ड मेसेज ओपन केल्यास तेथे तुम्हाला 100 हून अधिक असोसिएटेड कॉन्टेक्ट दिसतील. प्रत्येक कॉन्टेक्टचे नाव मोठे आणि विचित्र असेल. यामध्येच क्रॅश कोड लपलेला असतो. काही वेळेस वर्चुअल कार्डमध्ये काही गडबड करुन Payload इंजेक्ट केला जातो. ज्यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनवू शकते. (WhatsApp वर लवकरच येणार 'हे' दमदार फिचर, चॅटिंग करण्याचा अंदाज पूर्णपणे बदलणार)

जर तुम्हाला सुद्धा असा मेसेज येत असल्यास त्या कॉन्टेक्टला WhatsApp Web च्या माध्यमातून ब्लॉक करा. कॉन्टेक्ट ब्लॉक केल्यानंतर तुम्ही ग्रुपच्या प्रायव्हेसी सेटिंग्सला My Contacts किंवा My Contacts Except वर सेट करा. त्यानंतर व्हॉट्सअॅपचा वापर केल्यास वेबच्या माध्यमातून क्रॅश कोडवाले मेसेज डिलिट करा. तरीसुद्धा हे ऑप्शन काम करत नसल्यास व्हॉट्सअॅफ फोनमधून Uninstalled करुन पुन्हा Install करा. असे केल्यास मात्र तुमच्या चॅटची हिस्ट्री डिलिट होऊ शकते.