इस्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp त्यांच्या युजर्सासाठी प्रत्येक वेळी नवे फिचर्स घेऊन येतात. नुकतेच व्हॉट्सअॅपकडून युजर्सला डार्क मोड आणि डिलिट मेसेज सारखे फिचर्स उपलब्ध करुन दिले आहेत. त्यानंतर आता युजर्सला आणखी एक दमदार फिचर लवकरच मिळणार आहे. या फिचरच्या मदतीने युजर्सच्या चॅटिंग करण्याचा अंदाज पूर्णपणे बदलणार आहे. तर फेसबुकने कोरोनाच्या काळात व्हिडिओ कॉलिंगचा वाढता उपयोग पाहता मेसेंजरसाठी Rooms फिचर लॉन्च केले होते.(WhatsApp ला टक्कर देणारे ठरतेय Telegram App, युजर्सला प्रायव्हेट व्हिडिओ कॉलिंगचे दिले जाणार फिचर)
व्हॉट्सअॅप आता लवकरच युजर्ससाठी सुद्धा रुम्स (Rooms) हे फिचर घेऊन येणार आहे. या फिचरच्या माध्यमातून जवळजवळ 50 व्हॉट्सअॅप आणि व्हॉट्सअॅप वेब युजर्सला व्हिडिओ कॉलिंग करता येणार आहे. कंपनीचे असे मानणे आहे की, या फिचरचा युजर्सला खुप फायदा होणार आहे. त्याचसोबत आणखी एक नवे फिचर उपलब्ध करुन देणार असून त्याला मल्टी डिवाइस (Multi-Device) असे नाव देण्यात आले आहे. या फिचरच्या माध्यमातून युजर्सला एकच अकाउंट चार विविध हँडसेटमध्ये चालवता येणार आहे. परंतु डेटा सिंक करण्यासाठी Wifi चा वापर करावा लागणार आहे. या फिचर बद्दलचा खुलासा वेब बीटा इंफो यांनी दिली होती.
कंपनीने नुकत्याच युजर्ससाठी लेटेस्ट अॅन्ड्रॉइड बीटा वर्जन 138 वर नवे इमोजी जाहीर केले आहेत. यामध्ये शेफ, शेतकर आणि पेंटर सारखे इमोजी यांचा समावेश आहे. दरम्यान कंपनीकडून हे इमोजी स्टेबल वर्जनसाठी लॉन्च केलेले नाही. व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट फिचर Expiring Messages ची टेस्टिंग सुरु आहे. हे फिचर व्हॉट्सअॅप अॅन्ड्रॉइड बीटा वर्जन 2.20.197.4 वर स्पॉट करण्यात आले होते.(Facebook: धोकादायक, हानिकारक मजकूर, सामग्रीचा फेसबुकला कसा लागतो पत्ता?)
व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलिंग उत्तम बनवण्यासाठी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर एक वेगळे बटण जोडले जाणार आहे. या बटणाच्या माध्यमातून युजर्सला अगदी सहजतेने ग्रुप व्हिडिओ कॉलिंग करता येणार आहे. सध्या कंपनीकडून या फिचर्स बद्दल अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.