WhatsApp

व्हॉट्सअॅपने जोरदार कारवाई करत 2.9 दशलक्षाहून अधिक खाती बंद केली आहेत. IT नियम 2021 नुसार प्राप्त झालेल्या विविध तक्रारींच्या आधारे कारवाई करत WhatsApp ने ही कारवाई केली. WhatsApp ने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात ही कारवाई केल्याची माहिती देण्यात आली. WhatsApp प्रवक्त्याने सांगितले की, या अहवालात वापरकर्त्याच्या तक्रारी आणि WhatsApp द्वारे केलेल्या कारवाईचा तपशील तसेच WhatsApp च्या स्वतःच्या प्रतिबंधात्मक कृतींचा समावेश आहे.

WhatsApp प्रवक्त्याने पुढे सांगितले की, WhatsApp हे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड मेसेजिंग सेवांमध्ये दुरुपयोग रोखण्यासाठी प्रयत्नशिल आहे. आमच्या प्लॅटफॉर्मवर आमच्या वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही गेल्या काही वर्षांत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेटा सायंटिस्ट आणि तज्ञ आणि प्रक्रियांमध्ये सातत्याने गुंतवणूक केली आहे. त्यात वाढही करतो आहोत. IT नियम 2021 नुसार, आम्ही आमचा जानेवारी 2023 महिन्याचा अहवाल प्रकाशित केला आहे. ज्यात वापरकर्त्याच्या तक्रारी आणि WhatsApp द्वारे करण्यात आलेल्या संबंधित कारवाईचा तपशील आहे. तसेच WhatsApp च्या स्वतःच्या प्रतिबंधात्मक कृतींचा समावेश आहे. (हेही वाचा, WhatsApp New Feature: आता तुम्ही इमेजला स्टिकर्समध्ये बदलू शकणार; जाणून घ्या कसे)

ट्विट

WhatsApp ही Facebook च्या मालकीची क्रॉस-प्लॅटफॉर्म मेसेजिंग आणि व्हॉईस ओव्हर IP (VoIP) सेवा आहे. जी वापरकर्त्यांना मजकूर संदेश आणि व्हॉइस संदेश पाठविण्यास, व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल करण्यास आणि प्रतिमा, दस्तऐवज, वापरकर्ता स्थाने आणि इतर माध्यम उपलब्ध करुन देते. WhatsApp प्रामुख्याने मोबाइल डिव्हाइसवरून चालते. परंतू, ते डेस्कटॉप संगणकावरून देखील वापरता येते. व्हॉट्सअॅप सेवेसाठी वापरकर्त्याने मोबाइल नंबर प्रदान करणे आवश्यक आहे.