WhatsApp New Feature: आता तुम्ही इमेजला स्टिकर्समध्ये बदलू शकणार; जाणून घ्या कसे
WhatsApp Pixabay

WhatsApp या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platforms) वरून तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकता. व्हिडीओ कॉल्स, (Video Calls) व्हॉइस कॉल्स (Voice Calls) तसेच स्टेट्स पोस्ट करणे अशा प्रकारचे फीचर्स तुम्हाला यावर वापरायला मिळतात. WhatsApp हे आपल्या युझर्ससाठी नेहमीच नवनवीन फीचर्स लॉन्च करत असतात. आता देखील WhatsApp ने आपल्या IOS वापरकर्त्यांसाठी नवे फिचर्स आणले आहे. WhatsApp ने आपल्या iOS वापरकर्त्यांसाठी नवीन 'स्टिकर मेकर टूल' फिचर आणले आहे.

 

WABetaInfo च्या माहितीनुसार WhatsApp कडून हे फिचर विकसित करण्यात आले आहे. स्टिकर मेकर टूल iOS 16 ला सपोर्ट करेल आणि वापरकर्त्यांना त्यांच्या स्वतःच्या फोटोंमधून कस्टम स्टिकर्स तयार करता येणार आहे. हे फीचर सुरू झाल्यामुळे स्टिकर्स तयार करण्यासाठी थर्ड पार्टी अॅपची गरज लागणार नाही. कंपनी टप्प्याटप्प्याने iOS वापरकर्त्यांसाठी हे फिचर आणत आहे.  (WhatsApp Feature Update: व्हॉट्सअॅपने IOS यूजर्संसाठी आणलं खास फिचर; आता वापरकर्त्यांना व्हिडिओ कॉल चालू असताना वापरता येणार इतर अॅप्स)

स्टिकर मेकर टूल कसे वापरावे?

कस्टम स्टिकर्स तयार करण्यासाठी, वापरकर्त्यांना चॅटमध्ये इमेज पेस्ट करणे आवश्यक आहे. जर स्टिकर मेकर टूल उपलब्ध असेल, तर WhatsApp आपोआप चित्र स्टिकरमध्ये रूपांतरित करेल जे वापरकर्ता त्यांच्या स्टिकर संग्रहामध्ये जोडू शकेल. कोणत्याही थर्ड पार्टी अॅपशिवाय, WhatsApp वरील स्टिकर मेकर टूल नक्कीच वापरकर्त्यांचा वेळ वाचवेल.