आयडिया आणि व्होडाफोनच (Photo Credit: TheIndianWire)

रिलायन्सच्या जिओने टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये वादळ निर्माण केलं आहे. दिवसेंदिवस ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवे प्लॅन्स बाजारात आणले जात आहेत. टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी आयडिया आणि व्होडाफोननेदेखील हातमिळवणी केली आहे. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांना संतुष्ट ठेवण्यासाठी तसेच नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक नवा प्लॅन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार पोस्टपेड ग्राहकांना 50% सूट मिळणार आहे.

आयडिया- व्होडाफोनच्या ग्राहकांसाठी मोठी खूषखबर

आयडिया आणि व्होडाफोनच्या ग्राहकांना त्यांच्या पोस्ट पेड बिलात 50% सूट दिली जाणार आहे. त्यानुसार ग्राहकांना कमाल 2400 रूपयांचा फायदा होऊ शकणार आहे. दर महिन्याला तुमच्या फोनच्या बिलावर 200 रूपयांचा कॅशबॅक ऑफर सुरू केली आहे. याद्वारा वर्षभरात 2400 रूपयांपर्यतचा फायदा होणार आहे.

कसा मिळवाल कॅशबॅक

व्होडाफोन किंवा आयडिया ग्राहकांना पोस्टपेड मोबाईल बिल सिटी बॅंकेच्या क्रेडिट कार्डाने भरल्यास कॅशबॅक मिळणार आहे. अ‍ॅप आणि वेबसाईट अशा दोन्हीच्या माध्यमातून तुम्ही बिल भरू शकता.

299 पोस्टपेड प्लॅनवर ऑफर नाही

जर तुम्ही कंपनीचा 299 चा पोस्टपेड प्लॅन वापरत असाल तर मात्र तुम्हांला कॅशबॅक मिळणार नाही. कॅशबॅक मिळवण्यासाठी 399 चा व्होडाफोन रेड प्लॅन किंवा आयडियाचा 399 चा पोस्टपेस्ट प्लॅन असणं आवश्यक आहे.