वोडाफोन आयडिया (Vodafone-Idea) यांचे टॅरिफ प्लॅन्सच्या (Tarrif) किंमतीत वाढ होण्याची चर्चा दीर्घ काळापासूनच सुरु आहे. आता ET Telecom च्या एका रिपोर्टनुसार, टेलिकॉम कंपन्या टॅरिफ रेट्स 15-20 टक्क्यांपर्यंत वाढवू शकते. या प्रकरणाशी संबंधित दोन लोकांनी इकोनॉमिक्स टाइम्स यांना असे म्हटले की, टॅरिफ रेट्समध्ये वाढ ही 2020 किंवा 2021 च्या सुरुवातीला केली जाऊ शकते. Vi च्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले होते की, भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ पूर्वी कंपनी टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ करु शकते. आतापर्यंत एअरटेल आणि जिओने त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ केलेली नाही. मात्र वोडाफोन आयडिया यांना काही आर्थिक दबावांचा सामना करावा लागत आहे. या व्यतिरिक्त सब्सक्राइबर्स सुद्धा कमी होत चालले आहेत.
ईटी टेलिकॉम्स यांच्यासोबत बातचीत करताना एका व्यक्तीने म्हटले की, कंपनी टॅरिफ रेट्समध्ये वाढ करु शकते. कारण सध्या कंपन्या टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी द्वारे फ्लोर प्राइज ठरवण्याबद्दल विचार करत आहेत. दुसऱ्या सुत्रांनी असे म्हटले की, Vi डिसेंबर मध्ये टॅरिफ प्लॅनचे दर वाढवू शकते. कारण विश्लेषकांच्या मते वोडाफोन आयडिया आपली आर्थिक स्थिती पाहून टॅरिफ हाइक करु शकते. गेल्या वर्षात नोव्हेंबर महिन्यात टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ करणारी ती पहिली टेलिकॉम ऑपरेटिंग कंपनी बनली होती.(Vodafone Idea च्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये युजर्सला मिळणार अनलिमिटेड डेटा आणि Amazon Prime चे फ्री सब्सक्रिप्शन)
असे सुद्धा बोलले जात आहे की, एअरटेल आणि रिलायन्स जिओ टॅरिफच्या किंमतीत वाढ करण्यासाठी वाट पाहू शकते. या व्यतिरिक्त रिपोर्टमधअये असे ही म्हटले की Vi ने टॅरिफ हाइक संबंधित इंटरनल चर्चा आधीच केली आहे. वोडाफोन आयडिया द्वारे कमीत कमी 14 टक्क्यांची टॅरिफ रेट्समध्ये वाढ केली होती.