Vodafone Idea ने लॉन्च केला अनलिमिटेड नाइट टाइम डेटा, युजर्सला मिळणार काही खास बेनिफिट्स
Vodafone and Idea New Website (Photo Credits: myvi.in)

वोडाफोन आयडिया (Vodafone-Idea) कंपनीने युजर्ससाठी शानदार ऑफर आणली आहे. कंपनीने अनलिमिटेड हाय स्पीड नाइट टाइम डेटाची घोषणा केली आहे. खासियत अशी म्हणजे, यामध्ये युजर्सला अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार नाही आहे. अनलिमिडेट डेचाला लाभ युजर्सला 249 रुपये किंवा त्याहून अधिक किंमत असणाऱ्या अनलिमिटेड प्रीपेड प्लॅनचा फायदा घेऊ शकता. ही सुविधा रात्री 12 वाजून सुरु होणार असून ती सकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. तर जाणून घ्या या खास ऑफर बद्दल अधिक.(Vodafone Idea Plan: व्होडाफोन-आयडिया च्या 95 रुपयांच्या रिचार्जवर डेटासह 56 दिवसांची वैधता; जाणून घ्या Vi चे जबरदस्त रिचार्ज प्लान)

कंपनीच्या ऑफर बद्दल बोलायचे झाल्यास याचा लाभ अशा युजर्सला मिळणार आहे जे 16 फेब्रुवारी किंवा त्यानंतर रिचार्ज करणार आहेत. अनलिमिटेड डेटाचा वापर करणाऱ्या युजर्ससाठी कोणतीही बंदी नसणार आहे. यामध्ये संपूर्ण रात्र OTT प्लॅटफॉर्मचा आनंद घेता येणार आहे. कंपनीने त्यांच्या प्रेस रिलिजमध्ये असे म्हटले आहे की, प्रीपेड ग्राहक अनलिमिटेड डेटाचा वापर आरामात करु शकतात. आपला डेली डेटा संपल्यानंतर खुप वेळ चालणाऱ्या व्हिडिओ कॉलिमध्ये जोडले जाऊ शकतात. याचे मुख्य उद्देश म्हणजे युजर्सला आपल्याकडे आकर्षित करणे आहे.

टेलिकॉम ऑपरेटर वोडाफोन आयडिया यांनी अशी घोषणा केली आहे की, प्रीपेड युजर्स 249 रुपये किंवा त्याहून अधिक रिचार्जच्या प्लॅनवर अनलिमिटेड डेटाचा लाभ घेऊ शकतात. ऐवढेच नाही तर आपल्या प्रीपेड रिचार्जसह आठवड्याच्या अखेरीस डेटा रोलओव्हरचा सुद्धा लाभ घेऊ शकतात. नव्या ऑफरमध्ये Vi आपल्या युजर्सला सोमवार ते शुक्रवार पर्यंत आणि शनिवार ते रविवार पर्यंत एकत्रित केलेल्या डेटाचा लाभ घेण्याची संधी देणार आहे.(खुशखबर! VI चा 499 रुपयांचा नवा प्लान समोर अन्य टेलिकॉम कंपन्यांचे प्लान्स पडतील फिके)

दरम्यान वोडाफोन आयडियाने गेल्या दिवसात आपला 2959 रुपयांसह अतिरिक्त 50GB डेटा देण्याची घोषणा केली होती. त्याचसोबत हे स्पष्ट केले होते की, ऑफरचा लाभ फक्त वोडाफोन मोबाईल अॅपवरील टॉप अपसाठी वॅलिड असणार आहे. यामध्ये 2GB डेली डेटा, अनलिमिटेड कॉल आणि डेली 100 एसएमएस सुद्धा मिळणार आहेत.