खुशखबर! Vodafone आणले 90 दिवसांची वैधता असणारे 3 नवीन प्लान्स, सोबत मिळणार कॉलर ट्यून
वोडाफोन (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर ठेवण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे घरी बसलेल्या आपल्या युजर्सला खूश ठेवण्यासाठी टेलिकॉम कंपनी वोडाफोनने (Vodafone) 3 नवे भन्नाट प्लान्स आणले आहेत. या तीन प्लान्स चे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे यात तुम्हाला 90 दिवसांची वैधता मिळत असून तुम्हाला कॉलरटयून देखील मिळत आहे. हे प्लान्स वोडाफोनच्या 'वॅल्यू अॅडेड सेक्शन' (Value Added Section) मधील प्लान्स आहेत. यात तुम्हाला 47 रुपये, 67 रुपये आणि 78 रुपयांचा प्लान मिळत आहे. शिवाय कॉलर ट्यूनचा फायदा घेता येणार आहे. टेलिकॉम कंपनी च्या सुरु असलेल्या स्पर्धेत वोडाफोनचे हे नवीन प्लान्स नक्कीच युजर्सला आवडतील असे सांगण्यात येत आहे.

मात्र या प्लान्समध्ये वोडाफोन ग्राहकांना कोणतेही टॉकटाईमची ऑफर वा डेटा ऑफर देत नाही आहे. तर यात केवळ कॉलर ट्यून आणि जास्त दिवसांची वेलिडिटी मिळत आहे. Work From Home करणाऱ्यांना BSNL देणार एक महिन्यासाठी मोफत इंटरनेट सेवा

यातील 47 रुपयांच्या प्लानमध्ये युजर्सला 28 दिवसांसाठी कॉलर ट्यून आणि सर्विस वॅलिडीटी मिळत आहे. या प्लानमध्ये 28 दिवसांपर्यंत युजर्सचे इनकमिंग कॉल्स सुरु राहतील मात्र आऊटगोईंग कॉल्स साठी त्यांना टॉप-अप अथवा अन्य प्लान्स ने रिचार्ज करावे लागेल. तर 67 रुपयाच्या प्लान्स मध्ये 90 दिवसांसाठी कॉलरट्यून मिळेल. तसेच 78 रुपयांच्या प्लानमध्ये 89 दिवसांची वैधता आणि कॉलर ट्यून मिळत आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तीनही प्लान्समध्ये कोणत्याही प्रकारचे टॉकटाईम वा डेटा बेनिफिट्स मिळत नाहीय. त्यामुळे युजर्स त्यासंबंधीचे अन्य रिचार्ज करावे लागेल. खुशखबर! Vodafone ने आणला 95 रुपयांत 56 दिवसांच्या वैधतेसह जबरदस्त प्लान

लॉकडाऊनच्या काळात आपल्या युजर्सना त्याच्या आप्तलगांशी संपर्क करण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी टेलिकॉम कंपनी वोडाफोन आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे प्लान्स घेऊन येत आहे. त्यासोबत आपल्या काही जुन्या प्लान्समध्ये बदल करत ते देखील आपल्या युजर्ससाठी आणले आहेत. असाच एक युजर्सना बजेटमधील स्वस्त असा नवीन प्लान वोडाफोनने आणला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना केवळ 95 रुपयांत 56 दिवसांची वैधता मिळते आहे. या प्लानमध्ये 74 रुपयांचा टॉकटाम देखील मिळत आहे. तसेच प्रति सेकंदाला 2.5 पैसे मोजावे लागतील. सर्वात महत्वाचे म्हणजे याची वैधता 56 दिवसांचा प्लान असल्यामुळे ग्राहकांसाठी ही नक्कीच पर्वणी म्हणावी लागेल.