वोडाफोन

लॉकडाऊनच्या काळात आपल्या युजर्सना त्याच्या आप्तलगांशी संपर्क करण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी टेलिकॉम कंपनी वोडाफोन आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे प्लान्स घेऊन येत आहे. त्यासोबत आपल्या काही जुन्या प्लान्समध्ये बदल करत ते देखील आपल्या युजर्ससाठी आणले आहेत. असाच एक युजर्सना बजेटमधील स्वस्त असा नवीन प्लान वोडाफोनने आणला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना केवळ 95 रुपयांत 56 दिवसांची वैधता मिळते आहे. या प्लानमध्ये 74 रुपयांचा टॉकटाम देखील मिळत आहे. तसेच प्रति सेकंदाला 2.5 पैसे मोजावे लागतील. सर्वात महत्वाचे म्हणजे याची वैधता 56 दिवसांचा प्लान असल्यामुळे ग्राहकांसाठी ही नक्कीच पर्वणी म्हणावी लागेल.

हा प्लान याआधीही आला होता ज्यात केवळ 28 दिवसांची वैधता मिळत होती. मात्र त्यात फुल टॉकटाईम 500MB डेटा मिळत होता. त्यात काही बदल करुन वोडाफोनने हा नवीन प्लान आणला आहे. How To Open Google 3D Animal: Lion, Giant Panda, Penguin, Tiger यांसारखे प्राणी प्रत्यक्ष पाहण्यास मोबाईलमधील कमी जागेमुळे अडथळा येत असेल तर काय कराल? पाहा सोप्या स्टेप्स

 सध्या तरीही हा प्लान भारतात काही ठराविक शहरांतच ठेवण्यात आला आहे. ज्यात मुंबई, मध्य प्रदेश, कर्नाटक, केरळ, बिहार, तामिळनाडू, चेन्नई यांचा समावेश आहे. येथील आयडिया युजर्सही या प्लानचा लाभ घेऊ शकतात.

या प्लानमध्ये 200GB डेटा मिळत आहे. त्यासोबत 95 रुपयांत 74 रुपयांचा टॉकटाईम देखील मिळत आहे. या प्लानशिवाय वोडाफोनच्या ऑलराऊंडर प्लानमध्ये 39 रुपयांचा आणि 79 रुपयांचा प्लान देखील मिळत आहे. ज्यात 39 रुपयांच्या प्लानमध्ये 14 दिवसांची वैधता मिळत आहे. तर 79 रुपयांच्या प्लानमध्ये 28 दिवसांची वैधता मिळत आहे.