Twitterati share Google 3D images of animals with children (Photo Credits: Divya Menon, Arun Jacob Twitter)

लॉकडाऊनच्या (Lockdown) लहान मुलांना विरंगुळा म्हणून गुगलचे नवीन फिचर Google 3D Animals हे भन्नाट फिचर मदतीला आले आहे. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही वाघ, सिंह सारख्या प्राण्यांचा तुमच्या अगदी समोर असण्याचा अनुभव घेऊ शकता. लहाना मुलांना एक गंमत म्हणून हा एक उत्तम पर्याय आहे. सध्या लॉकडाऊन मुळे जगभरातील प्राणिसंग्रहालय बंद झाले आहे त्याला पर्याय म्हणून घराबाहेर न जाता मोबाईमधूनच हे प्राणी 3D च्या माध्यमातून घरी आणू शकता. पण हे फिचर काही मोबाईलमध्ये उघडत नाही. मोबाईलमधील जागेअभावी अथवा मोबाईल सेटिंग अपडेट न केल्याने ही समस्या उद्भवत आहे.

गुगलने सांगितल्याप्रमाणे हे प्राणी गुगलमध्ये सर्च केल्यानंतर view in 3D image मध्ये टॅब केल्यानंतर ती इमेज तुमच्या मोबाईलच्या कॅमे-याशी कनेक्ट होत नसल्यास खालील दिलेल्या सोप्या पद्धतीचा वापर करा.

Tiger in Google View in 3D Feature (File Photo)

1. मोबाईलमधील Settings मध्ये जा. तेथे Apps and Notifications या पर्यायावर टॅप करा

2. यानंतर आलेल्या पर्यायांमध्ये 'Google' अॅप निवडा आणि त्यानंतर 'Permissions' वर क्लिक करा. Google 3D Animals: Tiger, Giant Panda, Lion यांच्यासह विविध प्राणी-पक्षी क्वारंटाइनच्या काळात 3D इफेक्टमध्ये तुमच्या भेटीला!

3. त्यानंतर तेथे असलेल्या सर्व 'permissions' स्विच ऑन करा. ज्यामुळे तुम्हाला 'Google View in the 3D feature' पाहता येईल.

Tiger in Google 3D feature (Photo Credits: Google)

त्यानंतर ही जर का प्राण्यांची इमेज तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होत नसेल तर तुमच्या मोबाईलमध्ये जागा कमी आहे हे दिसून येते. यावेळी तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील अनावश्यक डेटा कमी करुन जागा करावी लागेल. या व्यतिरिक्त गुगलच्या सर्वरची काही समस्येमुळे अडथळा येत असेल तर थोडा वेळ वाट पाहा. जेणे करुन गुगल ती समस्या सोडविण्याच प्रयत्न करेल.

दुसरे म्हणजे तुमच्या मोबाईलमधील Cache clear करुन टाका ज्यामुळे थोडी जागा होईल. अन्यथा तुमचा मोबाईल Restart करुन पाहा जेणेकरुन तुम्ही Google View in 3D feature functions चा उपयोग करु शकाल.