लॉकडाउनच्या काळात घरुन काम करणाऱ्यांसाठी BSNL कंपनीने एक धमाकेदार ऑफर आणली आहे. त्यानुसार कंपनीने ब्रॉडबॅन्ड सेवा सुरु केली असून ते महिनाभर मोफत इंटरनेट सेवा देणार असल्याचे म्हटले आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न केला जात आहेच. याच संधीचा फायदा घेत बीएसएनएल यांनी सुद्धा त्यांच्या सर्व लॅन्डलाईन ग्राहकांना एका महिन्यासाठी अनलिमिटेड डेटा ऑफर करत आहे. तर महिनाभरानंतर ग्राहकांना डेटा प्लाननुसार पैसे भरावे लागणार आहेत.
लॅन्डलाइनमध्ये ब्रॉडबॅन्डची सेवा सुरु करण्यासाठी 18003451500 ग्राहकांनी या क्रमांकावर संपर्क करावा असे सांगण्यात आले आहे. लॉकडाउनच्या काळात ग्राहकांना एक महिन्याचा फुकट डेटा देणार असल्याची ऑफर दिलासा देणारी ठरणार आहे. तसेच BSNL तर्फे 20 एप्रिल पर्यंत आपल्या प्रीपेड सिमकार्डवरील सर्व सेवा या रिचार्ज न करता सुद्धा सुरु ठेवण्यात येतील अशी घोषणा करण्यात आली आहे. लॉक डाऊन काळात रिचार्ज करणे शक्य न झाल्यास फोनची सेवा बंद केली तर गरीब आणि गरजूंना फटका बसू शकतो त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.(कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा ट्रॅक ठेवण्यासाठी भारत सरकारने लाँच केले ‘आरोग्य सेतू' App; आजूबाजूच्या परिसरातील Coronavirus पेशंट्सची मिळणार माहिती)
तसेच BSNL TV च्या सेवेमधून प्रीपेड धारकांना काही ठराविक प्लान्स मध्ये मोफत लाईव्ह सेवा मिळणार आहे. ज्यात ते अनलिमिटेडे मूव्हीज, व्हिडिओजचा आनंद घेऊ शकतील. BSNL च्या STV 97, STV 365, STV 399, STV 997, STV 998 आणि STV 1999 या प्रीपेड प्लान्समध्ये मोफत ऑनलाईन टीव्हीची सुविधा मिळणार आहे.