Vivo Y91i (Photo Credits- Twitter)

विवो (Vivo) कंपनी लवकरच त्यांचा कमी किंमत असलेला स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Vivo Y91i या स्मार्टफोनसाठी भारतात 7,990 रुपयांपासून किंमत ठरवण्यात आली आहे. विवो कंपनीच्या स्मार्टफोनचे मलेशिया आणि थायलंड येथील संकेतस्थळावर झळकले असून या स्मार्टफोनचे फीचर्स समोर आले आहेत.

नुकताच विवो कंपनीने वाय 91 स्मार्टफोनच्या किंमतीत 1000 रुपयांची सूट दिली आहे. मुंबई आधारित टेलीकॉम रिटेलर यांनी गुरुवारी याबाबत अधिक माहिती देत असे सांगितले की, विवो वाय 91 आय स्मार्टफोनमध्ये 2GB RAM आणि 32GB स्टोरेज वेरियंट असणारा स्मार्टफोन 7,990 रुपयांना ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तर 32GB स्टोरेज वेरियंटमधील स्मार्टफोनसाठी 8,490 रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. डुअल सिम कार्ड या स्मार्टफोनसाठी देण्यात आले असून त्यासोबत अॅन्ड्रॉईड ओरियो आधारित फनटच ओएस 4.5 मिळणार आहे.(हेही वाचा-स्मार्टफोन खरेदी करायचा आहे? तर हे आहेत 10,000 रुपयांपर्यंत किंमत असलेले दमदार स्मार्टफोन)

विवो वाय 91 आय या स्मार्टफोनसाठी 6.22 इंचाचा एचडी प्लस आईपीएस डिस्प्ले दिला आहे. तसेच मीडिया टेक पी22 प्रोसेसर 2GB RAM सह ग्राहकांना मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये डुअल रिअर कॅमेरा सेटअप आहे.