भारतात सध्या विविध कंपन्यांचे स्मार्टफोन ग्राहकांना खरेदी करण्यास उपलब्ध आहेत. तसेच ग्राहकांना प्रत्येक स्मार्टफोनमध्ये नव्या पद्धतीचे तंत्रज्ञान आणि फीचर्स असलेले स्मार्टफोन खरेदी करण्याला पहिला दर्जा देतात. त्यामुळे जर तुम्ही नवीन एखादा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हे 10,000 रुपयापर्यंत किंमत असलेले स्मार्टफोन तुम्हाला लेटेस्ट व्हर्जन असलेले स्मार्टफोन बाजारात खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहेत.
या स्मार्टफोनसाठी उत्तम डिझाईन, बिल्ड क्वॉलिटी देण्यात आली आहे. तसेच तुम्ही हे स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी त्यावरील ऑफर्ससुद्धा एकदा पडताळून पाहू शकता. असे होऊ शकते ऑफर्समध्ये या स्मार्टफोनवर काही रुपयांची सूट मिळ्याची शक्यता आहे. कारण ई-कॉमर्स कंपन्या नेहमीच ग्राहकांना स्मार्टफोनवर सूट देत असते. तर पाहूयात कोणते आहेत हे स्मार्टफोन.
Redmi Note 7: हा स्मार्टफोन भारतात नुकताच लॉन्च झाला आहे. तसेच रेडमी नोट 7 बाजारात ही खरेदी करण्यासाठी ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपयांपासून सुरु आहे. तसेच 3GB RAM सोबत 32GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. तसेच टॉप वेरियंटमध्ये 4GB RAM आणि 64GB मेमरी देण्यात आली असून हा स्मार्टफोन तुम्हाला फक्त 11,999 रुपयात खरेदी करता येणार आहे.
Samsung Galaxy M10/ M20: सॅमसंग कंपनीचे हे दोन स्मार्टफोन मिड रेंजपेक्षा उत्तम आहेत. गॅलेक्सी एम 20 ची किंमत 10,990 रुपयांपासून सुरु होते आहे. तर गॅलेक्सी एम 10 तुम्हाला 8 हजार रुपयात खरेदी करता येणार आहे. एम 20 चे दोन वेरियंट असून एकामध्ये 32GB RAM आणि 32GB मेमरी आहे. तर दुसऱ्या वेरियंटमध्ये 4GB सोबत 64GB इंटरनल मेमरी देण्यात आले आहेत.
Realme 3: या नव्या स्मार्टफोनची विक्री 12 मार्च पासून सुरु करण्यात आली आहे. रेलमी 3 या स्मार्टफोनची डिझाईन आणि बिल्ड क्वॉलिटी उत्तम असल्याचे कंपनीने सांगितले आहे. रेलमी 3 ची किंमत 8,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच या वेरियंटमध्ये 3GB RAM सह 32GB मेमरी दिली आहे. रेलमी 3 च्या दुसऱ्या वेरियंटची किंमत 10,999 रुपये असून यामध्ये 4GB RAM आणि 64GB इंटर्नल मेमरी देण्यातआली आहे. नुकताच या स्मार्टफोनसाठी मीडियाटेक प्रोसेसर देण्यात आले आहे.
Nokia 5.1 Plus: एचएमडी ग्लोबलच्या या स्मार्टफोनची किंमत 9999 रुपये असून ग्राहकांना त्यांच्या खिशाला परवडाणाऱ्या किंमतीत उपलब्ध करुन दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हेलिओ पी 60 चिपसेच देण्यात आला आहे. 3GB RAM आणि 32GB इंटर्नल मेमरी देण्यात आली असून 3060 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
त्यामुळे जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचार करत असाल तर आताच ह्या ऑप्शन मधील दमदार स्मार्टफोन खरेदी करा.