वीवी मार्केटमध्ये त्यांचा लेटेस्ट मिड रेंज 5G स्मार्टफोन Vivo Y52s लॉन्च केला आहे. 8GB रॅम या स्मार्टफोनला देण्यात आला असून 48 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ड्युअल इंजिन फास्ट चार्जिंग सारखे शानदार फिचर्स दिले आहेत. याची सुरुवाती किंमत 1589 युआन (18,100 रुपये) आहे. याचा चीनमध्ये सेल 12 डिसेंबर पासून सुरु होणार आहे. तर भारतात लवकरच हा स्मार्टफोन उपलब्ध करुन दिला जाणार आहे. (Vivo Y51 स्मार्टफोन भारतात लॉन्च, किंमतीसह खासियत जाणून घ्या)
फोनमध्ये 1080X2408 पिक्सल रेज्यॉल्यूशनसह 6.58 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेचा ऑस्पेक्ट रेश्यो 20:1:9 आहे. डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटसह येणार आहे. 8जीबी पर्यंत रॅम आणि 128जीबी इंटरनल मेमोरी दिली आहे. फोन MediaTek Dimensity 720 Soc प्रोसेसरवर काम करणार आहे.(Oppo A33: खुशखबर! ओपो कंपनीचा धमाकेदार स्मार्टफोन 'ओपो ए 33' च्या किंमतीत मोठी घट)
फोटोग्राफीसाठी विवो वाय52एस स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी लेंन्ससह 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर दिला गेला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 8 मेगापिक्सल कॅमेरा मिळणार आहे.साइड माउंटेड फिंगप्रिंट सेंसर असणाऱ्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. हा स्मार्टफोन 18 वॅट ड्युअल इंजिन फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G,4G LTE, वायफाय, ब्लुटूथ वर्जन 5.1, जीपीएस/ए-जीपीएस, युएसबी टाइप सी आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे ऑप्शन मिळणार आहेत.