Vivo Y51 स्मार्टफोन भारतात लॉन्च, किंमतीसह खासियत जाणून घ्या
Vivo 51 (Photo Credits-Twitter)

टेक कंपनी Vivo ने त्यांची Y सीरिज मधील नवा स्मार्टफोन Vivo Y51 भारतात लॉन्च केला आहे. या दमदार स्मार्टफोनसाठी Snapdragon 665 प्रोसेसर दिला आहे. या व्यतिरिक्त फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळणार आहे. कंपनीने हा स्मार्टफोन यापूर्वी इंडोनेशिया मध्ये उतरवला होता. विवो वाय51 स्मार्टफोनच्या 8जीबी+128pजीबी स्टोरेज वेरियंटची किंमत 17,990 रुपये आहे. फोनला Titanium Saphhire आणि Crystal Symphony कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येणार आहे. अद्याप हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला नाही.

या स्मार्टफोनमध्ये 6.58 इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी आयपीएस डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रेज्यॉल्यूशन 2408X1080 पिक्सल आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रगॅन 665 प्रोसेसर, 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज दिला आहे. याचा इंटरनल स्टोरेज मायक्रो एसडीच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येणार आहे. हा डिवाइस अॅन्ड्रॉइड 10 वर आधारित Funtouch OS11 वर काम करणार आहे.(Nokia 2.4 स्मार्टफोन भारतात लॉन्च, 4500mAh च्या दमदार बॅटरीसह मिळणार 'हे' फिचर्स)

कंपनीने विवो वाय51 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यामध्ये पहिला 48MP चा प्रायमरी सेंसर, दुसरा 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि तिसरा 2MP चा Tertairy सेंसरसह येणार आहे. फोनच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनच्या बॅटरी सपोर्ट बद्दल बोलायचे झाल्यास ती 18W फास्ट चार्जिंगची असणार आहे. या व्यतिरिक्त वाय-फाय, जीपीएस आणि युएसबी टाइप सी सारखे कनेक्टिव्हिटी फिचर्स दिले आहेत.