HMD Global ने भारतात त्यांचा शिखाला परवडेल असा Nokia 2.4 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन Dusk, Fjord आणि Charcoal कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. फोनच्या 3GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरियंटची किंमत 10,399 रुपये आहे. Nokia 2.4 स्मार्टफोन एक्सक्लुसिव ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. स्मार्टफोन 26 नोव्हेंबर पासून Nokia च्या बेवसाईटवर खरेदी करता येणार आहे. 4 डिसेंबर पर्यंतच्या सकाळी 11 वाजेपर्यंत फोन खरेदी करणाऱ्या सुरुवाती 100 ग्राहकांना 007 स्पेशल अॅडिशन बॉटल, कॅप आणि मेटल किचन गिफ्ट दिले जाणार आहे.(Samsung Galaxy M12 स्मार्टफोन लवकरचं होणार लाँच; 7000mAh बॅटरीसह असणार 'हे' जबरदस्त फिचर्स)
नोकिया 2.4 स्मार्टफोनची विक्री 4 डिसेंबर पासून Amazon आणि Flipkart सह रिटेल आउटलेटवर उपलब्ध करुन दिला जाणार आहे. स्मार्टफोन खरेदीवर Jio ग्राहकांना 3550 रूपयांच्या बेनिफिट्सचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये 2000 रुपयांचा कॅशबॅक, 349 रुपये आणि 1550 रुपयांचा प्री-पेड वाउचरचा समावेश आहे. ही ऑफर सध्याच्या जिओ ग्राहकांसाठीच लागू असणार आहे.(Oppo A33: खुशखबर! ओपो कंपनीचा धमाकेदार स्मार्टफोन 'ओपो ए 33' च्या किंमतीत मोठी घट)
Power through your day with a 2-day battery life of Nokia 2.4.
To know more, visit: https://t.co/gctVZ4CmQi#Nokia2dot4 pic.twitter.com/Zg6QYehTNK
— Nokia Mobile India (@NokiamobileIN) November 23, 2020
स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला जाणार आहे. ज्याचे रेज्यॉल्यूशन 1600/720 पिक्सल असणार आहे. तर आस्पेक्ट रेश्यो 20:9 दिला जाणार आहे. फोन अॅन्ड्रॉइड 10 आणि अॅन्ड्रॉइ़ 11 Ready वर काम करणार आहे. त्याचसोबत स्मार्टफोन MediaTek Helio P22 सपोर्ट मिळणार आहे. फोनचा स्टोरेज मेमोरी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येणार आहे. Nokia 2.4 स्मार्टफोनच्या रियर पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 13MP चा असणार आहे. ज्याचे अपर्चर f/2.2 असणार आहे. तर दुसरा 2MP डेप्थ सेंसिंग कॅमेरा दिला आहे. या व्यतिरिक्त LED फ्लॅश लाइटचा सपोर्ट मिळणार आहे. फोनमध्ये 45000mAh ची बॅटरी मिळणार आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, फोन सिंगल चार्जमध्ये दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप देणार आहे. तसेच स्मार्टफोनला ड्युअल सिम सपोर्ट मिळणार आहे.