Vivo Y51 स्मार्टफोन भारतात लॉन्च, झिरो डाउन पेमेंट स्किम आणि 1 हजार रुपयांच्या कॅशबॅकवर घरी घेऊन जाता येणार
Vivo 51 (Photo Credits-Twitter)

Vivo Y51 स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्यात आला आहे. फोनमध्ये 8GB रॅम आणि 12GB स्टोरेज वेरियंट दिला गेला आहे. याची किंमत 17,990 रुपये ठेवली गेली आहे. फोन टायटेनियम सॅपहायर आणि क्रिस्टल सॅपहायर कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येणार आहे. फोनमध्ये साइड माउंडेट फिंगरप्रिंट स्कॅनर दिला गेला आहे. तसेच Qualcomm Snapdragon 662 SoC प्रोसेसर ही दिला गेला आहे. ज्यामध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी ही दिली असून जी 18W फास्ट चार्जर सपोर्टसह येणार आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप ही दिला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 48MP सेंसरसह येणार आहे.

विवो कंपनीचा हा स्मार्टफोन Vivo India e-store, Amazon, Flipkart, Paytm, TataCliq आणि सर्व रिटेल पार्टनर स्टोर मधून खरेदी करता येणार आहे. फोनच्या खरेदीवर HDFC बँक, Vi कडून 1 हजार रुपयांचा कॅशबॅक दिला जाणार आहे. फोन बजाज फायनान्स, होम क्रेडिट, IDFC फर्स्ट बँक, HDB क्रेडिट आणि ICICI बँकांच्या माध्यमातून झिरो डाऊन पेमेंट स्किम वर खरेदी करता येणार आहे.(OnePlus Nord N10 5G आणि Nord100 स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

Vivo Y51 स्मार्टफोन अॅन्ड्रॉइड 11 बेस्ड Funtouch वर काम करणार आहे. यामध्ये 6.58 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला गेला आहे. याचे रेज्यॉल्यूशन 1080X2408 पिक्सल असणार आहे. फोनमध्ये प्रोसेरच्या आधारावर Qualcomm Snapdragon 662 SoC काम करणार आहे. मेमोरी कार्डच्या मदतीने फोनचा स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येणार आहे.(Vivo Y20A ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत)

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 48MP असून 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 2MP ची लेन्स सपोर्ट मिळणार आहे. सेल्फीसाठी 16MP चा कॅमेरा दिला गेला आहे. पॉवरबॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी ही दिली आहे. जी 18W फास्ट चार्जर सपोर्ट करणार आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ड्युअल बँन्ड वायफाय, ब्लटूथ 5.0, USB टाइप सी, GPS चा वापर केला आहे. डायमेन्शबद्दल बोलायचे झाल्यास Vivo Y51 स्मार्टफोन 163.86X75.32X8.38mm साइजमध्ये येणार आहे. याचे वजन 188 ग्रॅम आहे.